पुणे - कोरोना संसर्गाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन सारखे सामाजिक चालनेला अचेतन करणारे , व्यवहाराचा गाडा ठप्प करणारे आणि अर्थव्यवस्थेला खीळ घालणारे पाऊल सरकारला उचलावे लागले. महाराष्ट्रात नव वर्षाच्या पूर्वसंध्येला लॉकडाऊन लागू झाले आणि महाराष्ट्रातील जनतेला घरात बसूनच नव वर्षच्या गुढीचे स्वागत करावे लागले. तेव्हा पासून बाजारपेठा ठप्प झाल्या. उद्योग व्यवसायाला अपरिमित नुकसान सोसावे लागले आहे.
अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त ही सुना जाणार, पुण्यात ऑनलाईन सोने खरेदीचाही पर्याय
अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र यंदा सोने खरेदीचा मुहूर्त पुणेकरांना साधता येणार नाही. पुण्यातील सोने चांदीची बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर शुकशुकाट आहे. महिन्या भरापासून पुण्यातील लक्ष्मी रस्ताच काय संपूर्ण शहर सुन्न आहे.
एक महिन्या नंतर ही लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक व्यवसाय अडचणीत आहेत. रविवारी अक्षय तृतीयेच्या अक्षय मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. अक्षय तृतीयेला सोने खरेदीने लक्ष्मी अक्षय राहते अशी धारणा असल्याने दरवर्षी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त नागरिकांकडून साधला जातो. मात्र यंदा सोने खरेदीचा मुहूर्त पुणेकरांना साधता येणार नाही. पुण्यातील सोने चांदीची बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर शुकशुकाट आहे. महिन्या भरापासून पुण्यातील लक्ष्मी रस्ताच काय संपूर्ण शहर सुन्न आहे.
मार्च एप्रिल महिन्यात लग्न सराई निमित्त सोने चांदीच्या दुकानात पाय ठेवायला जागा नसते. त्यात अक्षय तृतीया म्हटलं की पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावरील सोने चांदीच्या दुकानात नागरिकांच्या रांगा लावल्याचे यापूर्वी पाहायला मिळाले आहे. मात्र यंदा चित्र गंभीर आहे. इतर व्यवसाया प्रमाणे सोने चांदीच्या व्यवसायात लाखोंचे नुकसान झाले. असल्याचे व्यापारी सांगतात, सध्या दुकाने बंद असल्याने अक्षय तृतीये निमित्त नागरिक काही प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने सोने खरेदी करतील. मात्र त्याचे प्रमाण फार कमी असेल, असे व्यापाऱ्यांना वाटते. नागरिकांना दुकानात जाऊन सोने खरेदीत समाधान मिळते ते या माध्यमातून मिळणार नाही. एकंदरीतच कोरोनाच्या या संकटाने अक्षय तृतीयेचा अक्षय योग ही सुना जाणार आहे.