महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात साउंड लाईट असोसिएशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

मुख्यमंत्री तसेच राज्यातील इतर मंत्र्यांकडून देखील वारंवार रक्तदात्यांना रक्तदानासाठी आवाहन केले जात आहे. सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्यात लाईट साउंड मंडप असोसिएशनच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

By

Published : Apr 11, 2021, 4:05 PM IST

रक्तदान शिबीर
रक्तदान शिबीर

पुणे- राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंध लावण्यात आलेआहेत. तसेच राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा देखील जाणवत आहे. राज्य सरकारकडून लावण्यात आलेले कडक निर्बंध आणि वाढत्या कोरोना रुग्णसंखेमुळे मोठे रक्तदान शिबिर देखील होत नाही आहे. मुख्यमंत्री तसेच राज्यातील इतर मंत्र्यांकडून देखील वारंवार रक्तदात्यांना रक्तदानासाठी आवाहन केले जात आहे. सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्यात लाईट साउंड मंडप असोसिएशनच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

100 हुन अधिक पिशव्यांचे संकलन

राज्य सरकार कडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत लाइट्स साऊंड आणि मंडप असोसिएशनच्या वतीने पुण्यातील सृष्टी गार्डन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कलाकार तसेच पडद्यामागील कलाकार सहभागी झाले होते. रक्तदान शिबिरात 100 हून अधिक पिशव्यांचे रक्त संकलन केले आहे.

शासनाने लवकरात लवकर कार्यक्रमांना परवानगी द्यावी

गेल्या वर्षापूर्वी करोना च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर हळूहळू कार्यक्रम सुरू करण्यात आले. मात्र तेही 50% क्षमतेवर. त्यातही पुन्हा एकदा निर्बंध आणले गेले आणि कार्यक्रमांवर बंदी आली. त्यामुळे कलाकार आणि कर्मचाऱ्यांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शासनाने नियमावली करून व्यवसाय सूरु करावे, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details