पुणेजगभरातील 170 आणि देशांमध्ये 720 ठिकाणी असलेल्या इस्कॉन मंदिरात श्री कृष्ण जन्म महोत्सवाला Shri Krishna Janmashtami सूरवात झाली आहे. पुण्यात ही कात्रज कोंढवा रोड येथे इस्कॉन मंदिर असून या मंदिरात देखील गेल्या 10 दिवसांपासून श्रीकृष्ण जन्म महोत्सवाला सूरवात झाली आहे Shri Krishna Janmashtami celebration . पुण्यातील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्म महोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. नेमके इस्कॉन मंदिरात कश्या पद्धतीने श्रीकृष्ण जन्म महोत्सव साजरा केला जातो. हे पाहूयात how to celebrate Shri Krishna Janmashtami iskcon temple
असा साजरा केला जातो श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. जन्माष्टमीचा सण श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. दहीहंडीच्यावेळी तरुण एक संघ तयार करून त्यात सहभागी होतात. आजमितीला प्रत्येक विभागातून विविध मंडळे या उत्सवादरम्यान उंचावर दह्याने भरलेली हंडी म्हणजेच छोट्या आकाराचे मडके लावले जाते. ही हंडी तरुणांची विविध मंडळे म्हणजेच सहभागी झालेले गट फोडण्याचा प्रयत्न करतात. हा एक प्रकारचा खेळ आहे. ज्यात बक्षिसही दिले जाते. दहीहंडी दरवर्षी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात साजरी केली जाते. पण इस्कॉन मंदिरात दहीहंडी साजरी न करता जन्माष्टमी महोत्सव साजरा केला जातो. यात धार्मिक कार्यक्रम, पूजा, भजन कीर्तन आणि प्रसाद अश्या कार्यक्रमांचे आयोजन केले जातो.
2 दिवस साजरी होते जन्माष्टमीराज्यात सर्वत्र उद्या 18 ऑगस्ट रोजी श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. इस्कॉन मंदिरात iskcon temple जन्माष्टमी हा वृंदावनच्या नुसार देखील होतो. त्यामुळे इस्कॉन मंदिरात 18 आणि 19 या दोन दिवशी जन्माष्टमी साजरी केली जाते. विशेष बाब म्हणजे इस्कॉन मंदिरात 2 दिवस जन्माष्टमी साजरी केली जाते. आणि या जन्माष्टमी आधी 10 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यात लहान मुला मुलींचे नृत्य, भजन, किर्तन, अश्या सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे लहान मुलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. ज्या आधारे या लहान मुलांमध्ये चांगली सांस्कृतिक जपली जाईल. अशी माहिती यावेळी इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष श्वेता दीप दास यांनी यावेळी दिली.