पुणे - पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ( Katraj Dairy Election Result ) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळाली ( NCP Winning Katraj Dairy Election ) आहे. जिल्हा दूध संघ संचालक मंडळाच्या १६ जागा आहेत. यापैकी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या. आज ( सोमवार ) निकाल लागला असून, सर्व जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले ( NCP All Candidate Winning Katraj Dairy ) आहेत.
कात्रज दूध संघ संचालक मंडळाच्या १६ जागा आहेत. यापैकी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या. या निवडणुकीतील उर्वरित ११ जागांसाठी २५ उमेदवार निवडणूक आखाड्यात होते. या निवडणुकीसाठी आंबेगाव, भोर, दौंड, खेड, जुन्नर, शिरूर, मावळ, पुरंदर आणि वेल्हे या नऊ तालुक्यांत १०० टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यातील मुळशी व हवेली या दोन तालुक्यांचा अपवाद वगळता उर्वरित ९ तालुक्यांत पैकीच्या पैकी (१०० टक्के) मतदान झालेले. आज सकाळी नऊ वाजता मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर झाला असून, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी झाले आहे.