पुणे- जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतात लॉकडाऊन असून नागरिकांना घराबाहेर न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आर्थिक टंचाईमुळे हातावरचे पोट असणाऱ्या नागरिकांची अन्नाविना हाल होत आहेत. कित्येक जणांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. या सर्वांचा विचार करून पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे अमित बागुल यांच्यासह स्वयंसेवकांकडून गरजू नागरिकांना आठवडाभर पुरेल एवढा मोफत किराणा साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.
देशभरात अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या असून सर्व कामाची ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांचे हातावरचे पोट आहे त्यांनी काम केल्याशिवाय घरामध्ये अन्न शिजत नाही. गरजू नागरिकांना आठवडाभर पुरेल एवढा मोफत किराणा साहित्य वाटप करण्यास येत आहे. यामध्ये साखर, चहा पावडर, पोहे, तांदूळ, तेल, साबण, मीठ, मसाले, बिस्कीट याचे पॅकेट करून घरपोच देण्यात येत आहे. या साहित्याचे वाटप आजपासून शिवदर्शन पूरग्रस्त वसाहत ,संजयनगर झोपडपट्टी येथून सुरु असून गरजू नागरिकांना टप्या-टप्याने या सर्व वस्तूंचे केले जाणार आहे.