पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये बिस्कीट व चॉकलेटच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी वेळीच आग आटोक्यात आणली. अद्याप आग लागल्याचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.
पिंपरी-चिंचवडमध्ये चॉकलेट आणि बिस्कीटच्या गोदामाला आग; कारण अस्पष्ट
पिंपरी-चिंचवडमध्ये बिस्कीट व चॉकलेटच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी वेळीच आग आटोक्यात आणली.
परी-चिंचवडमध्ये बिस्कीट व चॉकलेटच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी वेळीच आग आटोक्यात आणली.
यामध्ये चॉकलेट आणि बिस्किटांची पाकिटे जळून खाक झाली आहेत. सकाळी इमारतीच्या तळ मजल्यावरून धुराचे लोट येऊ लागले. आगीची तीव्रता पाहून स्थानिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. काहीच क्षणात आग तळमजल्यावरून तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तत्काळ पोहोचून अडीच तासात आगीवर नियंत्रण मिळवले. या बचावकार्यात भोसरी आणि निगडी प्राधिकरण येथील गाड्यांचा सहभाग होता.