पुणे : मध्यरात्री उशिरा सुरू झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या(Rajya Sabha Election) मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. बऱ्याच राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. यावर अमृता फडणवीस यांनी आपल मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाले की, आज राज्यसभेत जे निवडून आले आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि अपक्ष आमदाराच्या पाठिंब्यामुळे हा विजय झाला आहे. आजचा हा विजय सत्याचा आहे. आजचा निकाल पाहता सर्वजण सत्याच्या बाजूने आहेत, असे मला वाटत आहे, असे यावेळी अमृता फडणवीस यांनी सांगितले.
हा सत्याचा विजय आहे : पुण्यात भारतीय जनता महिला आघाडीच्या वतीने बुधवार पेठ येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. अकेला देवेंद्र है क्या करेंगा यावर अमृता फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की, मला खूप आनंद आहे की कभी देवेंद्र अकेला था ना अब अकेला है. उनके साथ पुरी कायनात है. हम तो साथ में है. जो प्रगती का राजकारण है वही आहे आयेंगा नाही. टोमणे का राजकारण आगे आयेंगा असं यावेळी अमृता फडणवीस यांनी सांगितल.