पुणे - महसूल विभागाची खरीप हंगाम नियोजनाबाबत पालकमंत्री अजित पवार आणि राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत पुणे विभागाचा खरीप हंगामा बाबत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत केंद्रासह राज्याच्या कृषी विभागाच्या योजना 100% राबवण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
केंद्रासह राज्याच्या कृषी विभागाच्या योजना 100 टक्के राबविणार - अजित पवार
पिकांचे उत्पादन वाढावे याकरता गाव पातळीवर कृषी मंडळ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बैठका घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. विदर्भात कापसाचे उत्पादन वाढवण्याकरता तीनशे कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. शासकीय योजनांमध्ये महिला कृषी शेती करणाऱ्या वाढवण्याकरता आणि त्यांना प्रोत्साहन देण्याकरता विशेष काम केले जाणार आहे, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
कापसाचे उत्पादन वाढवण्याकरता तीनशे कोटींची तरतूद - पिकांचे उत्पादन वाढावे याकरता गाव पातळीवर कृषी मंडळ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बैठका घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. विदर्भात कापसाचे उत्पादन वाढवण्याकरता तीनशे कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. शासकीय योजनांमध्ये महिला कृषी शेती करणाऱ्या वाढवण्याकरता आणि त्यांना प्रोत्साहन देण्याकरता विशेष काम केले जाणार आहे, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
पीक पद्धती आणि त्याचे नियोजन - राज्यात हवामान विभागाच्या सूचनेनुसार पीक पद्धती आणि त्याचे नियोजन करण्यात येणार असून त्याबद्दल ही सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच सध्याचे वाढते तापमान पाहता राज्यात काही ठिकाणी हवामान विभागाने जाहीर केला असून त्याचा पिकांवर काही परिणाम झाल्यास त्याबद्दल योग्य ते नियोजन करण्याबाबत हे सांगण्यात आले आहे. या बैठकीस राज्यमंत्री विश्वजीत कदम सहकार मंत्री बाळासाहेब पाटील जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त आदी अधिकारी उपस्थित होते