पुणे - राज्य सरकारने ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावले आहे. पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय या भीतीने पुण्यात काम करणाऱ्या परप्रांतीय नागरिक पुन्हा आपापल्या गावाला निघाले आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या मोठ्या संख्येने वाढ होत आहे. पुन्हा जर लॉकडाऊन लागला तर गेल्यावर्षीप्रमाणे आम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागेल. म्हणून आत्ताच हे परप्रांतिय आपल्या गावाला निघाले आहे. रेल्वे प्रशासनाच्यावतीने देखील एप्रिल महिन्यात पुणे ते दनापूर ही विशेष गाडी सुरू केली आहे.
कोरोनामुळे पुण्यातील परप्रांतिय मजूर निघाले गावाला, म्हणाले- पुन्हा तो त्रास नको
राज्य सरकारने ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावले आहे. पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय या भीतीने पुण्यात काम करणाऱ्या परप्रांतिय नागरिक पुन्हा आपापल्या गावाला निघाले आहेत.
पुन्हा तो त्रास नको-
मागच्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. तो भयावह अनुभव पुन्हा आम्हाला नको म्हणून आम्ही परत आमच्या गावाला जात आहो, अशी प्रतिक्रिया काही परप्रांतियांनी दिली. आत्ता कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. पण जर पुढे लॉकडाऊन लावलं तर आम्ही करायचं काय, म्हणून आम्ही परत आमच्या गावाला जात आहोत, असं यावेळी परप्रांतिय नागरिक म्हणाले.
रेल्वेकडून एप्रिल महिन्यात विशेष गाड्या-
रेल्वे प्रशासनाकडून मुंबई ते गोरखपूर, पटना, दरभंगा आणि पुणे ते दनापूर, अशा अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. आठवड्यातून दोन दिवस हे विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. केवळ कम्फर्म तिकीट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष ट्रेनमधून जाता येणार आहे. प्रवाश्यांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यवस्थानाच्या वेळी कोविड 19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे. जोपर्यंत नियमित रेल्वे सुरू होत नाही तोपर्यंत अश्या पद्धतीने विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे.
राज्यात सातत्याने गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. पुण्यातील रेल्वे स्थानक येथून 130 हुन रेल्वे दिवसभरातुन देशातील वेगवेगळ्या ठिकाणी ये-जा करत आहेत. लॉकडाऊन लागणार की काय या भीतीने परप्रांतिय आपापल्या गावाला जात आहेत. पुणे स्टेशन येथून सोडण्यात आलेल्या या गाड्यांमध्ये फक्त बिहार, पटना आणि दिल्लीच्या गाड्यांनाच गर्दी होत आहे. इतर गाड्यांना मात्र काहीच गर्दी होत नाहीये.
हेही वाचा-महाराष्ट्रात लसीचा तुटवडा, केवळ ३ दिवस पुरेल एवढी लस राज्यात उपलब्ध - आरोग्यमंत्री