पुणे - कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर गेली 2 वर्ष सर्वच सण-उत्सव हे निर्बंधांत साजरे करावे लागले. यंदा मात्र निर्बंध मुक्त झाल्याने सर्वच सण उत्सव हे मोठ्या उत्साहात साजरा होत आहेत. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची तयारी शहरातील प्रत्येक मंडळाकडून होत असून, यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे. पुण्यातील विविध मंडळांच्या वतीने यंदा देशभरातील विविध मंदिरांची तसेच तीर्थक्षेत्र यांची प्रतिकृती देखाव्यांच्या माध्यमातून साकारण्यात येत आहे. पुण्यातील सदाशिव पेठ येथील छत्रपती राजाराम मंडळाच्या वतीने देखील यंदा तीर्थक्षेत्र बालाजी मंदिराची प्रतिकृती देखाव्याच्या माध्यमातून साकारण्यात येत आहे. replica of Tirupati Balaji Temple this year दरम्यान, आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी पुण्यातील राजाराम मंडळाच्या वतीने साकारण्यात येत असलेल्या तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रतिकृती देखव्याच आढावा घेतला आहे-
Chhatrapati Rajaram Mandal in Pune पुण्यातील छत्रपती राजाराम मंडळ यंदा साकारणार तिरुपती बालाजी मंदिराचीची प्रतिकृती
कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर गेली 2 वर्ष सर्वच सण-उत्सव हे निर्बंधांत साजरे करावे लागले. यंदा मात्र निर्बंध मुक्त झाल्याने सर्वच सण उत्सव हे मोठ्या उत्साहात साजरा होत आहेत. Chhatrapati Rajaram Mandal in Pune काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची तयारी शहरातील प्रत्येक मंडळाकडून होत असून, यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे. पुण्यातील विविध मंडळांच्या वतीने यंदा देशभरातील विविध मंदिरांची तसेच तीर्थक्षेत्र यांची प्रतिकृती देखाव्यांच्या माध्यमातून साकारण्यात येत आहे.
गणेश भक्तांना मोफत प्रवेश असणार - छत्रपती राजाराम मंडळाचे यंदा 131 वे वर्ष असून मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी गणेशोत्सवात विविध मंदिरांची प्रतिकृती देखाव्याच्या माध्यमातून साकारण्यात येते. यंदा साऊथ मधील हुबेहूब तिरुपती बालाजी मंदिर देखाव्याच्या माध्यमातून साकारण्यात येत आहे. देखाव्याचे काम हे 80 टक्के पूर्ण झाले असून तिरुपती बालाजी मंदिर हे मुंबई येथील 50 हून अधिक कारागिरांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. गणेशोत्सवाच्या एक ते दोन दिवस आधीच तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती ही पूर्ण होणार असून गणेश भक्तांना मोफत प्रवेश असणार आहे. असे यावेळी मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर यांनी सांगितल आहे.