महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रसंगी कर्ज काढू - चंद्रकांत पाटील

पुरात लाखो नागरिकांना फटका बसला आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेकजण वैयक्तिक तसेच संघटनात्मक पातळीवर मदत करत आहेत. सरकारकडून ही आता आर्थिक मदत देण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रसंगी कर्ज काढू - चंद्रकांत पाटील

By

Published : Aug 14, 2019, 3:43 PM IST

पुणे - घटनेतील प्रत्येक व्यक्तीचे पुनर्वसन केले जाणार असून सरकारकडून वेळ प्रसंगी यासाठी कर्ज देखील काढेल जाईल असे अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली. पुण्यात जिल्ह्या नियोजन बैठकीसाठी चंद्रकांत पाटील आले होते, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रसंगी कर्ज काढू - चंद्रकांत पाटील

ते पुढे म्हमाले, सांगली आणि कोल्हापूर परिसरातल्या पुरग्रस्ताचे पुनर्वसन करण्याचे मोठे आव्हान आता सरकार समोर आहे. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू तातडीने पुरवण्यासाठी सरकार झटत आहे. या पुरात लाखो नागरिकांना फटका बसला आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेक जण वैयक्तिक तसेच संघटनात्मक पातळीवर मदत करत असून सरकार कडून ही आता आर्थिक मदत देण्याचे काम सुरू झाले आहे अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

राज्यातील पूरग्रस्त भागातील 4 लाख 53 हजार लोकांना पुरस्थितीतून सुरक्षित बाहेर काढले आहे. आता पुरामुळे कोणी अडकलेले नाही. 500 च्या वर निवार केंद्र उभारण्यात आली आहेत. या निवारा केंद्रात 3 लाखापेक्षा जास्त लोक राहत आहेत. कोल्हापूरमध्ये 2 कोटी रूपयांची मदत देण्यात आली आहे. पुराचा फटका बसलेल्या गावाचे पुनर्वसन हा आता मोठा प्रश्न असून सहा ते आठ महिने हे काम चालणार आहे. प्रत्येक आठवड्याला होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details