महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

स्वतःच अपयश लपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना हात जोडून विनंतीची नाटकं - चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावरून चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी ते काही भरघोस उपाय जाहीर करतील, अशी अपेक्षा होती.ण प्रत्यक्षात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याची घोषणा केली. अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

By

Published : May 6, 2021, 12:39 AM IST

Updated : May 6, 2021, 12:47 AM IST

Chandrakant Patil criticizes Thackeray government
Chandrakant Patil criticizes Thackeray government

पुणे - स्वतः काही करायचे नाही आणि केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकायची, हा नेहमीचा प्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीतही केला आहे. अशा रितीने मराठा समाजाच्या भवितव्याशी खेळणे त्यांच्या सरकारने बंद करावे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

बुधवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावरून चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी ते काही भरघोस उपाय जाहीर करतील, अशी अपेक्षा होती. किमान सरकारने चुका केल्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण हातचे गेले, त्याबद्दल क्षमायाचना तरी करतील, असे वाटले होते. पण प्रत्यक्षात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याची घोषणा केली.

ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू योग्य रितीने मांडता आली नाही. म्हणून विरोधी निकाल लागला. त्याबद्दल त्यांनी एका शब्दाने दिलगिरी व्यक्त केली नाही. आता केंद्र सरकारवर सर्व काही ढकलून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी चालविला आहे अशी टीका पाटील यांनी केली आहे.

Last Updated : May 6, 2021, 12:47 AM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details