पुणे - मानाचा पहिल्या ग्रामदैवत कसबा गणपती याची स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीर आणि वीरांगणा यांना मानवंदना म्हणून थोर क्रांतिकारक राजगुरू यांच्या कुटुंबियांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेट्टे, यावेळी कसबा गणपती मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Ganpati Mandals In Pune ) ढोल ताशाच्या गजरात श्रींची मिरवणूक काढण्यात आली. तब्ब्ल दोन वर्षांनी वाजत गाजत श्रींची मिरवणूक काढण्यात आली. मोठ्या भक्ती भावाने गणेश भक्तांनी या मिरवणूकीत गर्दी केली होती. लोकमान्य टिळक यांनी यांनी या उत्सवाची सुरवात केली होती. यात संघर्ष, वाद्यवृंद, श्रीराम पथक आणि प्रभात बँड सहभागी झाले होते. यंदा या उत्सवाचे 135 वे वर्ष आहे.
मानाचा दुसरा ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्राण प्रतिष्ठापना -मानाच्या दुसऱ्या ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी मंडळाची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १२.३० वाजता सन चौघडा व संबळच्या कर्णमधूर साथीत कॉसमॉस बँ अध्यक्ष व मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे विश्वस्त मिति अनंत काळे व मीरा मिलिंद काळे यांच्या हस्ते झाली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.चांदीच्या पालखीत विराजमान होत असलेल्या मानाच्या दुसऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या 'श्रीं'च्या आगमनाची मिरवणूक सकाळी १०.३० वाजता नारायण पेठेतील न. चिं. केळकर रस्त्यावरील मंदार लॉज येथून कुंटे चौक, गणपती चौक मार्गे उत्सव मंडपात पोहोचली. या मिरवणुकीत आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बॅन्ड, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, ताल पथक, विष्णुनाद शंख पथक, आम्ही गोंधळी गोंधळी संबळ पथक सहभागी झाले होते. 'श्रीं'ची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १२.३० वाजता सन चौघडा व संबळच्या कर्णमधूर साथीत कॉसमॉस बँ अध्यक्ष व मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे विश्वस्त मिति अनंत काळे व मीरा मिलिंद काळे यांच्या हस्ते होणार झाली.यंदा या मंडळाच्या उत्सवाचे 129वे वर्ष आहे.
मानाचा तिसरा गुरुजी तालीम मित्र मंडळ ची प्राण प्रतिष्ठापना - मानाच्या तिसऱ्या गुरुजी आणि मित्र मंडळाची प्राणप्रतिष्ठापना दुपारी २ वाजून १० मी. पुनीत व जान्हवी बालन यांच्या हस्ते करण्यात आली. तत्पूर्वी श्रींच्या आगमनाची मिरवणूक सकाळी १०.३० वाजता गणपती चौकातून सुरू झाली. गणपती चौक, लिंबराज महाराज चौक- अप्पा बळवंत चौक- जोगेश्वरी चौक गणपती चौक मंडप या मार्गावरून मिरवणूक निघाली. मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारा वादन, अतु बेहरे यांचे महिलांचे नादब्रह्म पथक, गर्जना पथक, गुरुजी प्रतिष्ठान, श्री ढोल ताशा पथक येरवडा, सम प्रतिष्ठान, नादब्रह्म ट्रस्ट पथक यांचा समावेश होता. सुभाष सरपाले व स्वप्नील सरपाले यांनी बनविलेल्य आकर्षक फुलांच्या रथातून श्रींची मिरवणूक निघाली.यावेळी मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यंदा या उत्सवाचे 1३६ वे वर्ष आहे.
मानाच्या चौथा महागणपती तुळशीबाग गणपती ची प्रतिष्ठापना - मानाच्या चौथ्या श्री तुळशीबाग गणपती मंडळाच्या 'श्रीं'ची प्राणप्रतिष्ठापना दुपारी २.३० वाजता उद्योजक पुनीत व जान्हवी बालन यांच्या हस्ते झाली. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता 'श्रीं'ची मिरवणूक गणपती चौक, नगरकर तालीम चौक, अप्पा बळवंत चौक, बुधवार चौक, समाधान चौक ते गणपती चौक मार्गे उत्सव मंडपात पोहोचली. या मिरवणुकीत शिवगर्जन समर्थ प्रतिष्ठान, उगम ही पथके सहभागी झाले होते.यावेळी तुळशीबाग मित्र मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, नितीन पंडित, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यंदा या उत्सवाचे १२२ वर्ष आहे.