पुणे - कोरोनाच्या पाश्वभूमीवर देशासह राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मे महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या निकालानंतर नव्या शैक्षणिक वर्षाची पुस्तके, वह्या अशा शालेय साहित्य खरेदीसाठी गजबजलेलं अप्पा बळवंत चौक यंदा कोरोनामुळे शांत झालं आहे. प्रतिबंधित क्षेत्राच्या जवळचा परिसर असल्यामुळे अप्पा बळवंत चौकातील दुकाने उघडू शकली नाहीत.
शालेय साहित्यसाठी गजबजलेलं अप्पा बळवंत चौक लॉकडाऊन 4 मध्येही शांत..!!
मे महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या निकालानंतर नव्या शैक्षणिक वर्षाची पुस्तके, वह्या अशा शालेय साहित्य खरेदीसाठी गजबजलेलं अप्पा बळवंत चौक यंदा कोरोनामुळे शांत झालं आहे. प्रतिबंधित क्षेत्राच्या जवळचा परिसर असल्यामुळे अप्पा बळवंत चौकातील दुकाने उघडू शकली नाहीत.
शालेय साहित्य खरेदीची बाजारपेठ हा लौकिक असलेला अप्पा बळवंत चौक बालक आणि पालकांच्या गर्दीपासून दूर राहिला आहे. शालेय साहित्य खरेदीची बाजारपेठ असलेल्या अप्पा बळवंत चौक परिसरात शंभराहून अधिक दुकाने आहेत. गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेली ही दुकाने लॉकडाऊन 4 मध्येतरी उघडतील अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु प्रतिबंधित क्षेत्राच्या जवळ असल्याने येथाल दुकाने उघडली गेली नाहीये.
शाळांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मे महिन्यापासूनच पुढील वर्षाच्या पुस्तके, वह्या, शालेय साहित्य खरेदीसाठी अप्पा बळवंत चौक गजबजलेल असतो. शालेय व महाविद्यालयीन पुस्तके खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात पालकांसह विद्यार्थी याठिकाणी येत असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून देशासह राज्यात लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. दोन महिन्यांपासून या भागातील दुकाने बंद आहे. लॉकडाऊन 4 मध्ये प्रशासनाने काही सूट दिली असली तरी प्रतिबंधित क्षेत्रातील दुकाने अजून उघडण्यास परवानगी देण्यात आली नाहीये. त्यामुळे लॉकडाऊन 4 मध्येही या भागातील पुस्तक विक्रेत्यांना दुकाने उघडण्यास प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच या ठिकाणी जुन्या पुस्तकांची खरेदी करणाऱ्या पथारी व्यावसायिकांनाही याचा फटका बसला आहे.