पुणे- नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पानिपत चित्रपटातून मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास हिंदुस्थानच्या जनतेसमोर मांडला आहे. गेल्या काही काळात बाजीराव मस्तानी, पानिपत अशा चित्रपटांतून पेशवा या मराठेशाहीतील योद्ध्यांचा दुर्लक्षित पराक्रम जगासमोर भव्य स्वरूपात येतो आहे. एकेकाळी भारतावर साम्राज्य प्रस्थापित केलेल्या या पेशव्यांचा इतिहास पाहिला तर त्यांच्या वंशजांना पेशव्यांच्या राजधानी पुणे शहरात प्रवेश नव्हता. त्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली होती. आणि बऱ्याच काळाने पुन्हा पुण्यात येऊ पाहणाऱ्या त्यांच्या वंशजांना ज्या पुण्यात त्यांच्या पूर्वजांचे साम्राज्य होते, त्या पुण्यात चक्क भाड्याच्या घरात राहायची वेळ आली होती.
पानिपतच्या युद्धानंतर पेशवाईला मोठा धक्का बसला. या धक्क्यानंतर सहा महिन्यांतच नानासाहेब पेशवे यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर वयाच्या 16 व्या वर्षी माधवराव पेशव्यांच्या खांद्यावर पेशवाईची धुरा आली. त्यांनी महादजी शिंदे, नाना फडणवीस यांच्या मदतीने मराठ्यांचे राज्य विस्तारले. मात्र, नंतर हळूहळू पेशवाईची रया गेली. देशात ब्रिटिशांचा अंमल वाढला असताना दुसरा बाजीरावने ब्रिटिशांशी तह केला. पुढे ब्रिटिशांनी दुसरा बाजीराव यांना ब्रह्मव्रतला पाठवले. त्यानंतर त्यांना कैदही केले. तर अमृतराव पेशवे यांनाही पुणे सोडून वाराणसीला पाठवण्यात आले. पेशव्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली. नंतरच्या पेशव्यांना ब्रिटिशांनी पुण्यात येऊ दिले नाही. पेशवे पुन्हा पुण्यात आले तर लोक त्यांच्यासोबत येतील आणि ब्रिटिशांच्या विरोधात कारस्थान करतील, अशी भीती ब्रिटीशांना होती. त्यामुळे नंतरच्या पेशव्यांना पुण्यात येऊ दिले गेले नाही. अखेर 1930 ला पेशव्यांची आठवी पिढी पुण्यात येऊ शकली.
शनिवाड्याच्या मालकांनाच पुण्यात राहायला घर नव्हते-