पुणे - महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगत महत्त्वाच्या कामांना यापूर्वी ब्रेक लावण्यात आला होता. मात्र, दुसरीकडे महापालिका आयुक्तांनी आगामी वर्षाचे अंदाजपत्रक सादर करताना कोटीच्या कोटींची उड्डाणे घेतली आहेत. महापालिका आयुक्त विक्रम मौऱ्या यांनी यंदा 7 हजार 650 कोटींचे अंदाजपत्रक मांडले आहे. कोरोनामुळे यावर्षी उत्पन्नात मोठी घट आली असताना सुध्दा अंदाजपत्रकामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी फुगवलेले अंदाजपत्रक मांडले असल्याची टीका विरोधी पक्षांकडुन करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त कुमार यांनी मागिल महापालिका आयुक्तांच्या तुलनेमध्ये 1421 कोटींचे वाढीव अंदाजपत्रक सादर केले आहे. मागिलवर्षी 6229 कोटींचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले होते.
महापालिका आयुक्तांकडून यंदा 7 हजार 650 कोटींचे अंदाजपत्रक सादर महापालिका प्रशासनाला उत्पन्नाचे नवे स्त्रोत वाढविण्यात अपयश -
उत्पन्नाचे नवे स्त्रोत वाढविण्यात अपयश आले आहे. असे असतानाही आयुक्तांकडून मात्र कोणतेही पर्याय न देता अंदाजपत्रक फुगविण्यात आले आहे. शहरातील पायाभूत सुविधा वाढविणे, प्रमुख 20 रस्ते पीपीपी मॉडेलद्वारे विकसित करणे, येरवड्यात वाहतूक उद्यान उभारणे, घनकचरा, पाणी पुरवठा, इलेक्ट्रिक बस खरेदी, दहा किलोमीटरचे सायकल ट्रॅक तयार करणे आदीसाठी तरतूद केली आहे.यातील काही योजनांना शासनांचे अनुदान मिळणार असले तरी महापालिकेच्या हिस्सा भरण्यासाठी देखील तिजोरीची अवस्था नाजूक आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या विकासकामांसाठी पैसा येणार कुठून आसा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पातून 11 गावांचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. नदी सुधार प्रकल्पावर विशेष भर दिले जाणार असून त्यासाठी 150 कोटींची तरतूद केली आहे. झोपडपट्टीमुक्त शहर, पंतप्रधान आवास योजना आणि पालिका कर्मचारी यांना हक्काची घरे देण्याविषयीही तरतूद केली आहे. खासगी भागीदारीतून अत्याधुनिक प्रशिक्षण देणारे केंद्र उभारणार आहे. तसेच आयटी स्टॅर्ट अॅप साठी निधी देऊन केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. नियमित कर भरणाऱ्यांसाठी आयुक्तांनी अंदाजपत्रकात लॉयल्टी स्कीम आणणार असल्याची माहिती दिली आहे. सीएसआरच्या माध्यमातून आरोग्य व शिक्षण सुविधा सुधारणार व आणखी नावीन्य आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील सांगितले आहे. नवीन लाईट हाऊस तयार करणे, डिजिटल लिटरसीवर भर देणार असेही आयुक्त विक्रम कुमार म्हणाले.
नवीन योजना -
- समाविष्ट 11 गावांसाठी मैलापाणी शुध्दीकरण प्रकल्प उभारणे
- बाणेरमध्ये ओल्या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प
- अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय
- फुरसुंगी आणि देवाची उरुळी येथे टीपी स्कीम
- 4 नवीन उड्डाणपुलांची निर्मीती
- घोले रस्ता याठिकाणी शहर ग्रंथालय