पुणे -शहरात आठवीमध्ये शिकणाऱ्या एका चौदा वर्षीय मुलीची कोयत्याने मानेवर वार करून निर्घून हत्या केल्याची घटना 12 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी बिबवेवाडीमधील यश लॉन्स परिसरात घडली होती. घटनेतील मुख्य आरोपीसह इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी मुलीच्या घरी जाऊन तीच्या आई-वडिलांची भेट घेतली. तसेच या प्रकरणाचा योग्य तो पाठपुरावा करून हे प्रकरण सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे द्यावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण -
शहरात आठवीमध्ये शिकणाऱ्या एका चौदा वर्षीय मुलीची कोयत्याने मानेवर वार करून निर्घून हत्या करण्यात आली होती. मंगळवारी 12 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी बिबवेवाडी मधील यश लॉन्स परिसरामध्ये घडली होती. ही मुलगी इयत्ता 8 वी मध्ये शिकत होती. ती शाळेत कबड्डी खेळाडू होती. ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत यश लॉन्स परिसरात कबड्डीचा सराव करीत होती. यावेळी तिच्या नात्यातला एक तरुण आणि त्याचे साथीदार त्या ठिकाणी आले. त्याने तिला बाजूला घेऊन तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. यावेळी त्या मुलांनी तिच्या मैत्रिणींना लांब पळवून लावले. सोबत आणलेल्या कोयत्याने तिच्या गळ्यावर वार केला. ती खाली पडल्यानंतर त्याने तिच्या गळ्यावर एकामागे एक असे वार करण्यास सुरुवात केली. अत्यंत भीषण पद्धतीने आरोपीने तिची निर्घृण हत्या केली.