पणजी- उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यातील 48 मतदारसंघात शनिवारी मतदान होणार आहे. कोविड -19 च्या दरम्यान होणाऱ्या या मतदानासाठी कोविड रुग्णांना शेवटच्या एका तासात मतदान करण्याची संधी देण्यात आली आहे.
21 फेब्रुवारी 2020 रोजी घोषणा होऊन 22 मार्च रोजी मतदान होणार होते. यासाठीची संपूर्ण प्रचार प्रक्रिया पूर्ण झाली होती. परंतु, 22 मार्चला जनता कर्फ्यु लागल्याने 24 रोजी मतदान घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु, नंतर कोविड-19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने टाळेबंदीमुळे लागू केली. त्यामुळे मतदान प्रक्रिया अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती.
दि. 5 डिसेंबर रोजी गोवा राज्य निवडणूक आयुक्त चोखाराम गर्ग यांनी मतदान आणि निवडणूक प्रक्रियेची घोषणा केली. यानुसार दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान तर सोमवारी (दि. 14) मतमोजणी होणार आहे.
उत्तर गोव्यात 25 तर दक्षिण गोव्यात 23 मतदारसंघात मतदान
आज माध्यमांशी बोलताना राज्य निवडणूक आयुक्त गर्ग यांनी कोविडच्या काळात होणाऱ्या या मतदानासाठी मोठ्य संख्येने घर बाहेर पडून मतदान करावे. यासाठी आवश्यक सर्व नियमांचे पालन करावे, जसे की, मास्क अथवा चेहरा झाकणे, सँनिटायझर आणि शारीरिक अंतर याकडे लक्ष द्यावे. 50 पैसे 48 मतदारसंघात मतदान होणार आहे. उत्तर गोव्यात 25 तर दक्षिण गोव्यात 23 मतदारसंघात मतदान होणार आहे. दोन्ही जिल्ह्यात 7 लाख 91 हजार 814 मतदार आहेत. उत्तर गोव्यात 13 तर दक्षिण गोव्यात 9 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. तर राज्य भरातील 10 संवेदनशील मतदान केंद्रावर आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोविड-19 बाधित रुग्ण शेवटच्या एका तासात मतदान करू शकणार आहेत. यासाठी पीपीई किट आणि सँनिटायझन यांची तरतूद करण्यात आली आहे.