महाराष्ट्र

maharashtra

नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करा, आसाम वाचावा; आसाम सोसायटी ऑफ गोवा'ची निदर्शने

By

Published : Dec 22, 2019, 8:12 AM IST

संपूर्ण गोव्यात विविध कामानिमित्त असलेले आणि मूळ आसाम राज्यातील असलेले सुमारे शंभरेक नागरिक आझाद मैदानावर एकत्रित जमले होते. आसाम वाचवा, सीएए कायदा रद्द करा, अशी मागणी करणारे फलक हातात धरून नागरिकांनी सीएए विरोधात निदर्शन केले.

goa
'आसाम सोसायटी ऑफ गोवा'तर्फे निदर्शने

पणजी -केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात 'द आसाम सोसायटी ऑफ गोवा'तर्फे शनिवारी पणजीतील आझाद मैदानावर शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली.

'आसाम सोसायटी ऑफ गोवा'तर्फे निदर्शने

संपूर्ण गोव्यात विविध कामानिमित्त असलेले आणि मूळ आसाम राज्यातील असलेले सुमारे शंभरेक नागरिक आझाद मैदानावर एकत्रित जमले होते. यामध्ये युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. आसाम वाचवा, सीएए कायदा रद्द करा, अशी मागणी करणारे फलक हातात धरून नागरिकांनी सीएए विरोधात निदर्शन केले.

हेही वाचा - मडगाव येथे ‘आदि महोत्सवा’ला सुरुवात
सध्या देशभरात सीएए आणि एनसीआर विरोधात संतापाची लाट उसळली असून मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर येवून निदर्शने करत आहेत. गोव्यातही यापूर्वी 'असोसिएशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईटस्'च्यावतीने नागरिकत्व सुधारणा कारद्याला जाहीर सभेद्वारे विरोध करण्यात आला. तसा ठरावही यावेळी घेण्यात आला होता.

हेही वाचा - देशव्यापी संपात गोव्यातील कामगार संघटना येणार एकत्र

ABOUT THE AUTHOR

...view details