पणजी - राज्यात वाढत चाललेल्या बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने येत्या पावसाळी अधिवेशनात ( monsoon session ) धर्मांतरण विरोधी कायदा आणण्याचे ठरविले आहे. राज्यात नुकतेच बेकायदेशीररित्या धर्मांतरण करणाऱ्या व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व त्याच्या पत्नीला गोवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यावर प्रतिक्रिया देताना डॉ. प्रमोद सावंतांनी ( Goa CM On Conversion ) सांगितलं की, येत्या पावसाळी अधिवेशनात अशा प्रकारच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी धर्मांतरण विरोधी कायदा करणार आहे.
बेकायदेशीर धर्मांतरण आला राज्या थारा नाही -राज्यात डॉमनिक डिसोजा सारखे अनेक बिलीवर हिंदू धर्माच्या गरीबी व येथील लोकांच्या साधेपणाचा फायदा घेऊन बेकायदेशीरपणे धर्मांतरण करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करत आहेत. यांच्या या कृत्यामुळे राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊन जातीय व धार्मिक सलोखा बिघडवण्याचे काम सुरू झाले होते. म्हणून त्याच्याविरुद्ध प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार गोवा पोलिसांनी याला अटक केली होती. तसेच भविष्यात अशा प्रकारचे कृत्य होऊ नये म्हणून याविषयी योग्य तो कायदा पारित करून अशा कृत्यांना आपण आणि आपले सरकार आळा घालणार असल्याचेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( Goa CM Pramod Sawant ) म्हणाले.