महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गणेशाची आतुरता... वाढली गणेशमूर्ती शाळामधील लगबग

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मूर्ती शाळांमधील लगबग वाढली आहे. गणेशमूर्तीला अंतिम स्वरूप देण्यासाठी कलाकार रात्र-रात्र जागून मूर्ती घडवत आहेत.

By

Published : Aug 28, 2019, 3:11 PM IST

गणेशाची आतुरता... वाढली गणेशमूर्ती शाळामधील लगबग

पणजी - गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मूर्ती शाळांमधील लगबग वाढली आहे. गणेश मूर्तीला अंतिम स्वरूप देण्यासाठी कलाकार रात्र-रात्र जागून मूर्ती घडवत आहेत.

गणेशाची आतुरता... वाढली गणेशमूर्ती शाळामधील लगबग

हेही वाचा - अपंगत्वावर मात करून 'ते' जिद्दीने साकारतात गणेशमूर्ती

गोव्यात घरगुती गणेशपूजन हे मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे गणेश मूर्तींना मोठी मागणी असल्याने गावोगावी गणेश मूर्ती शाळा दिसत आहेत. जेथे कलाकार रात्रंदिवस राबत असतात. कधीकधी त्यांना घरातील मंडळी मदत करतात. मागील काही वर्षांत शाडूच्या मूर्तीबरोबरच 'प्लास्टर ऑफ पॅरिस'च्या मूर्ती पुजेसाठी वापरल्या जात आहेत. त्यामुळे अशा मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध होत असतात. परंतु, घरगुती पुजेसाठी वापरल्या जात असल्याने किंमती वाढल्या आहेत. तरीही मातीच्या मूर्तीची मागणी कायम आहे.

हेही वाचा - पाचवीत बघितलेले स्वप्न झाले पूर्ण; आता गणेश मूर्तींचा उभारणार कारखाना

यावर्षी आलेल्या पुराचा फटका येथील मूर्तीकारांनाही जाणवत आहेत. मूर्तीसाठीचे रंगसाहित्य हे कोल्हापूर आणि सांगली येथून आयात केले जाते. त्यामुळे मूर्तींना अंतिम रुप देण्यासाठी वेळ लागत आहे. उत्तर गोव्यातील डिचोली तालुक्यातील मये गावात मोठ्या प्रमाणात मातीच्या मूर्ती बनवल्या जातात. त्यांना दुरवरून मागणी असते. काही ठिकाणी तर केवळ हंगामाच्या सुरुवातीला जेवढे मागणी असते तेवढ्याच मूर्ती बनवल्या जातात.

कलाकाराशी बातचीत -

मये येथील अमर शेठ हे अशाच एका मूर्ती शाळेचे मालक आणि कलाकार आहे. ते आपल्या घरातील तिसऱ्या पिढीचे मूर्तिकार आहेत. आपला व्यवसाय सांभाळून ते ही कला जोपासत आहेत. याविषयी बोलताना अमर म्हणाले, आमच्या आजोबांनी ही मूर्ती शाळा सुरू केली. त्यानंतर बाबा सांभाळत असत आणि आता मी सांभाळत आहे. आमची जेवढी मागणी असते तेवढ्याच मातीच्या मूर्ती घडवतो. यासाठी काही कारागीरांची मदत घ्यावी लागते. यावर्षी पावसामुळे रंगकामाला थोडा उशीर झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details