पणजी- उत्तर गोव्यातील अंजुना येथे एका 60 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एका 22 वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे. लालरिनुन्नज लाल फकजुआला असे आरोपीचे नाव असून तो मिझोरम येथील रहिवासी आहे. आरोपीला मंगळवारी रात्री पीडितेच्या घरून अटक करण्यात आली आहे.
पणजीत ६० वर्षीय महिलेवर बलात्कार करून जीवे मारण्याचा प्रयत्न; एक अटकेत
पणजीत ६० वर्षीय महिलेच्या घराजवळ असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या २२ वर्षीय आरोपीने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. बलात्कार केल्यावर उशीच्या साहाय्याने पीडितेला त्याने मारण्याचा प्रयत्न केला.
पीडित महिलेच्या घराजवळच असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या आरोपीने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. बलात्कार केल्यावर उशीच्या साहाय्याने पीडितेला त्याने मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने जोरात आरडाओरड करायला सुरूवात केली. तो आवाज ऐकून तेथे आलेल्या इतर वेटरांनी पीडितेची सुटका करत आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.
आरोपी विरोधात अंजुना पोलीस ठाण्यात बलात्कार व जीवे मारण्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.