महाराष्ट्र

maharashtra

Goa Election 2022 : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांची भाजपाला सोडचिठ्ठी

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर ( Former Cm Manohar Parrikar ) याचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी भाजपाला रामराम ठोकला ( Utpal Parrikar Resign BJP ) आहे. शुक्रवारी पर्रिकर यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

By

Published : Jan 22, 2022, 3:27 AM IST

Published : Jan 22, 2022, 3:27 AM IST

Utpal Parrikar
Utpal Parrikar

पणजी -माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर याचा मुलगा उत्पल पर्रिकर ( Former Cm Manohar Parrikar ) यांनी भाजपाला रामराम ठोकला ( Utpal Parrikar Resign BJP ) आहे. शुक्रवारी पर्रिकर यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एएनआय वृत्तसंकेतस्थळाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, उत्पल पर्रिकर यांनी पणजी मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्पल पर्रिकर यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला ( Utpal Parrikar Resign BJP ) आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे जेष्ठ नेते मनोहर पर्रिकर हे पणजी मतदारसंघातून निवडून येत. त्यांच्या निधनानंतर याठिकाणी भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. येथून आता उत्पल पर्रिकर भाजपाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, भाजपाने त्यांना उमेदवारी नाकारत मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर केली.

तसेच, उत्पल पर्रिकर यांनी पणजी ऐवजी अन्य मतदारसंघातून लढण्याबाबत पर्याय देण्यात आला होता. मात्र, भाजपाने जाहीर केलेल्या यादीत उत्पल पर्रिकर यांना पणजीतून उमेदवारी नाकारण्यात आल्याचे दिसले. त्याच पार्श्वभूमीवर उत्पल पर्रिकर यांनी आता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला ( Utpal Parrikar Independent Candidate ) आहे.

हेही वाचा -Goa Assembly Election : ठरलं.. उत्पल पर्रिकर पणजी मतदारसंघातून अपक्ष लढणार, भाजपचा प्रस्ताव धुडकावला

ABOUT THE AUTHOR

...view details