महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amit Palekar : कोण आहेत अमित पालेकर? ज्यांना 'आप'ने बनवलं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून अमित पालेकर यांचं ( Amit Palekar is the face of Chief Minister by AAP ) नाव आम आदमी पक्षानं जाहीर केलं. अमित पालेकर हे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. ते व्यवसायाने वकील असून ते भंडारी समाजातून येतात. गोव्यात लोकसंख्येच्या जवळपास 35 टक्के असणाऱ्या या भंडारी समाजातून गोव्यात आजवर केवळ एक मुख्यमंत्री झाला आहे.

By

Published : Mar 9, 2022, 12:55 PM IST

Amit Palekar
अमित पालेकर

पणजी - गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी 40 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. 10 मार्चला म्हणजे उद्या निकाल लागणार आहे. 40 जागांसाठी झालेल्या या मतदान प्रक्रियेत 301 उमेदवारांचे भवितव्य ठरणार ( Goa Assembly Election Result 2022 ) आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष उतरला आहे. निवडणुकीत 'आप' हा एक महत्त्वाचा फॅक्टर मानला जातो आहे. 2017 मध्ये विधानसभा निवडणुकीत 'आप'नं गोव्याच्या राजकारणात प्रवेश केला आणि 39 जागांवर निवडणूक लढवली. पण सगळीकडे त्यांचा पराभव झाला होता. मात्र, यंदा 'आप' गोव्यात महत्त्वाची भूमिका निभावेल, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून अमित पालेकर यांचं ( Amit Palekar is the face of Chief Minister by AAP ) नाव आम आदमी पक्षानं जाहीर केलं. अमित पालेकर हे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. ते व्यवसायाने वकील असून ते भंडारी समाजातून येतात. गोव्यात लोकसंख्येच्या जवळपास 35 टक्के असणाऱ्या या भंडारी समाजातून गोव्यात आजवर केवळ एक मुख्यमंत्री झाला आहे.

ग्राफिक्सच्या माध्यमातून अमित पालेकर यांच्याविषयी वाचा...

अमित पालेकर हे गोव्यात प्रसिद्ध राजकारणी आहेत. ते व्यवसायाने वकील आहेत. पण सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची बरीच ओळख आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दावर ते नेहमीच मांडत आले आहेत. पालेकर हे गोव्यातील सांताक्रूझ परिसरात राजकारणात दीर्घकाळापासून सक्रिय आहेत. 2017 पासून ते आम आदमी पक्षाशी संबंधित असले तरी त्यांच्यासाठी राजकारण नवीन नाही. त्यांची आई दहा वर्षे सरपंच होत्या.

ग्राफिक्सच्या माध्यमातून अमित पालेकर यांच्याविषयी वाचा...
ग्राफिक्सच्या माध्यमातून अमित पालेकर यांच्याविषयी वाचा...

कोरोनाकाळात लोकांना मदत -

अमित पालेकर यांनी कोरोनाच्या काळात लोकांना खूप मदत केली. देशभरातील रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता असताना पालेकर यांनी स्वत:हून 135 खाटा स्थानिक रुग्णालयाला दान केल्या होत्या. रुग्णांना उपचार देण्यासोबतच त्यांनी लॉकडाऊनमध्ये प्रवास करणाऱ्या कुटुंबांनाही मदत केली होती.

ग्राफिक्सच्या माध्यमातून अमित पालेकर यांच्याविषयी वाचा...
ग्राफिक्सच्या माध्यमातून अमित पालेकर यांच्याविषयी वाचा...

बेकायदेशीर बांधकामाविरोधात आंदोलन -

अमित पालेकर पूर्वी गोव्यात खूप चर्चेत होते. जुने गोवा हेरिटेज कॉम्प्लेक्समध्ये बेकायदेशीरपणे बांधण्यात येत असलेल्या बंगल्याविरोधात त्यांनी उपोषण केले. त्यांच्या या कारवाईने गोवा सरकारलाही धक्का बसला. सरकारला त्यांच्यापुढे झुकून वादग्रस्त रचनेवर कारवाई करावी लागली. अमितच्या उपोषणादरम्यान अरविंद केजरीवाल स्वतः त्यांना भेटायला आले होते.

ग्राफिक्सच्या माध्यमातून अमित पालेकर यांच्याविषयी वाचा...
ग्राफिक्सच्या माध्यमातून अमित पालेकर यांच्याविषयी वाचा...

प्रत्येक शब्द पूर्ण करेल -

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अमित पालेकर यांनी निवड झाल्यावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी तुम्हाला भ्रष्टाचारमुक्त गोव्याची हमी देतो. गोव्याचे हरवलेले वैभव आपण परत मिळवू, असा गोवा तयार करू ज्याचे प्रत्येकाने स्वप्न पाहिले होते. मी सांगितलेला प्रत्येक शब्द मी पाळीन आणि तीच माझी हमी आहे. आता गोव्यातील जनता कुणाच्या हातात सत्तेच्या चाव्या देते, हे उद्या समजणार आहे.

ग्राफिक्सच्या माध्यमातून अमित पालेकर यांच्याविषयी वाचा...

हेही वाचा -Next CM Of Goa : कोण होणार गोव्याचा मुख्यमंत्री? भाजप बदलणार उमेदवार? काँग्रेसचा 'हा' नेता बिघडवणार गणित, की मगोप मारणार बाजी

ABOUT THE AUTHOR

...view details