महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पर्रीकरांच्या आजाराभोवतीच फिरत राहीले गोव्याचे राजकारण

राज्यातील ३ विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीनंतरच गोव्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

By

Published : Mar 17, 2019, 10:36 PM IST

मनोहर पर्रीकर

हैदराबाद - गोव्याचे मुख्यंत्री मनोहर पर्रीकर यांचे रविवारी दीर्घ अजाराने निधन झाले. त्यांना अन्नाशयाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. ते आजारी पडल्यानतंर त्यांच्या आजाराभोवतीच गोव्याचे राजकारण फिरत राहिले. फक्त विरोधी पक्षच नव्हे तर स्वपक्षाकडूनही याबाबत राजकारण करण्याचे प्रयत्न झाले.

काँग्रेसचा सत्तास्थापनेसाठी दावा..
गोव्यात काँग्रेसने राज्यपालांना पत्र पाठवून सत्तास्थापनेचा दावा केला होता. पर्रिकर हे आजारी असल्याने ते सरकार चालवू शकत नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी सरकार बरखास्त न करता काँग्रेसला सत्तास्थापनेची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

गोवा फॉरवर्डचा पर्रीकरांना पाठिंबा..
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी भाजपला नव्हे तर मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्री म्हणून आमचा पाठिंबा असल्याचे म्हटले होते. पर्रिकर मुख्यमंत्री असल्याने नवा नेता निवडण्याची गरज नाही. मात्र, भाजपने आपला विधीमंडळ नेता निवडण्याची गरज असल्याचे ते म्हणाले होते.

भाजपकडून नव्या मुख्यमंत्र्यांचा शोध
काँग्रेसने केलेल्या सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर भाजप सावध झाला. या पार्श्वभूमीवर आमदरांच्या बैठकी घेतल्या. भाजपकडून नव्या मुख्यमंत्र्यांचा शोध सुरू करण्यात आला. राज्यातील आमदारांशी चर्चा करून केंद्रीय नेतृत्व नव्या मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय घेईल. नवा मुख्यमंत्री विद्यमान आमदारांमधूनच निवडला जाईल. याबद्दलच्या सर्वच गोष्टी लवकरच स्पष्ट होतील, असे भाजपकडून सांगण्यात आले होते.

पोटनिवडणुकीनंतर चित्र होईल स्पष्ट..
राज्यातील ३ विधानसाभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीनंतरच पुढची दिशा ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. मांद्रे, शिरोडा आणि म्हापसा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होईल. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. मात्र, त्यांच्या सत्ता स्थापनेपूर्वीच भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यांनंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ३, गोवा फॉरवर्ड पार्टीचे ३ आणि ३ अपक्ष आमदारांच्या मदतीने भाजपने सत्ता स्थापन केली. संरक्षणमंत्री पदाचा राजीनामा देऊन पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले होते. सध्या काँग्रेसकडे १४ तर भाजपकडे १३ आमदार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details