महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशकात बनावट मुद्रांकांवर खोटे दस्ताऐवज तयार करून शेतजमिनीचा व्यवहार

देवळा तालुक्यातील मेशी यथील शेतकरी भास्कर निकम यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर भास्कर निकम वडिलोपार्जित जमिनीवर नाव नोंदणी करायला गेले. तर त्यांची जमीन ही परस्पर विकली गेल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

Transaction of agricultural land in Nashik by producing false documents on fake stamps
नाशकात बनावट मुद्रांकांवर खोटे दस्ताऐवज तयार करून शेतजमिनीचा व्यवहार

By

Published : Mar 6, 2021, 6:24 PM IST

नाशिक - नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा स्टॅम्प घोटाळ्यानं डोकं वर काढल आहे. बहुचर्चित तेलगी स्टॅम्प घोटाळ्यानंतर या घटनेनं पुन्हा एकदा नाशिक चर्चेत आल आहे. सध्या तरी देवळा तालुक्यातील, कोट्याधीश झालेला एक स्टॅम्प वेंडर जाळ्यात सापडला असला तरी या मुद्रांक घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याची माहिती समोर येत आहे.


एकाच क्रमांकाच्या 2 स्टॅम्पचा केला गेला वापर-

देवळा तालुक्यातील मेशी यथील शेतकरी भास्कर निकम यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर भास्कर निकम वडिलोपार्जित जमिनीवर नाव नोंदणी करायला गेले. तर त्यांची जमीन ही परस्पर विकली गेल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. निकम यांनी अधिक चौकशी केली असता चक्क एकाच क्रमांकाच्या 2 स्टॅम्पवर ही विक्री झाल्याचा प्रकार समोर आले. भास्कर निकम यांना या प्रकरणात काहीतरी घोटाळा झाल्याच लक्ष्यात आलं. निकम यांनी लगेच पोलिसात धाव घेतली पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, संशयीत स्टॅम्प वेंडर फरार झाला आहे.

नाशकात बनावट मुद्रांकांवर खोटे दस्ताऐवज तयार करून शेतजमिनीचा व्यवहार
गुन्हा दाखल झाल्या पासुन अरोपी फरार-
देवळा पोलीस स्टेशन येथे मुद्रांक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दोन अरोपी विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्या पासुन दोन्ही अरोपी फरार आहेत. अरोपीना अटक करण्यासाठी पथक स्थापन केले आहे. अरोपी तीथे जाऊ शकता तीथे पथक त्याच्या शोध घेत असल्याचे पोलीस उपअधीक्षक समीर गायकवाड यानी सांगितले आहे.देवळा स्टॅम्प घोट्याळ्याची गंभीर दखल घेत महसूल आणि मुद्रांक विभाग जिल्हाभरात झालेल्या ४० हजार दस्त रॅन्डम्ली तपासणार आहेत. मुंंद्रांक विभागाने १२ पथकांची स्थापना केली असून आतापर्यंत ३०० दस्तांची तपासणी पूर्ण झाली आहे. देवळा तालुक्यात बनावट मुद्रांकांद्वारे शेतजमिनीच्या बोगस व्यवहाराचे प्रकरणामुळे दोन्ही विभागाने दस्त तपासणीचा निर्णय असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले आहे.
मुद्रांक विक्रेत्याचा परवाना रद्द-
बनावट मुद्रांकांवर खोटे दस्ताऐवज तयार करून शेतजमिनीचा व्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार देवळा तालुक्यात घडला. जिल्ह्यात अन्य काही ठिकाणी देखील अशा प्रकारे फसवणूक झाल्याच्या तक्रारी मुद्रांक विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्याची तीव्र दखल घेत, जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात संबंधित मुद्रांक विक्रेत्याचा परवाना रद्द केला आहे. मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांना चौकशीचे आदेश दिले असून त्यांनी १२ जणांचे पथक स्थापन केले आहे. गेल्या काही काळात तब्बल ४० हजार दस्त झाले असून या सर्वांचीच तपासणी केली जाणार आहे. त्यानुसार आतापर्यंत ३०० दस्त तपासण्यात आले आहेत. त्याचा अद्याप अहवाल आला नसून, जिल्ह्यातील इतर दुय्यम निबंधक कार्यालयांतही बनावट दस्ताद्वारे फसवणूकीचे प्रकार घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे ४० हजार दस्त रॅन्डमली तपासत असून त्यात कुठे शंका वाटल्यास त्याची सखोल तपासणी केली जाणार आहे. दरम्यान या तपासणी मोहिमेमुळे जिल्ह्यात बनावट मुद्रंकाद्वारे फसवणुकिचे अनेक प्रकार उघडकिस येण्याची चिन्हे आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details