महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Student Died in Road Accident : गाव येऊनही न थांबल्याने चालत्या रिक्षातून मारली उडी; विद्यार्थिनीचा मृत्यू

शाळेतून घरी परत येताना गाव येऊनही चालकाने रिक्षा न थांबवल्याने चालत्या रिक्षातून दोन विद्यार्थिंनींनी उडी मारली. त्यातील एका दहावीच्या मुलीच्या डोक्याला मार लागल्याने दुर्दैवी मृत्यू ( Student Died in Road Accident ) झाला.

Student Died in Road Accident
Student Died in Road Accident

By

Published : May 4, 2022, 6:44 PM IST

नाशिक : शाळेतून घरी परत येताना गाव येऊनही चालकाने रिक्षा न थांबवल्याने चालत्या रिक्षातून दोन विद्यार्थिंनींनी उडी मारली. त्यातील एका दहावीच्या मुलीच्या डोक्याला मार लागल्याने दुर्दैवी मृत्यू ( Student Died in Road Accident ) झाला. तर अकरावीत शिकणारी मुलगीही गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर पोलिसांनी रिक्षाचालकास अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री चकणे आणि सायली आव्हाड या दोघी विद्यार्थिंनीं सिन्नर येथील जनता महाविद्यालयातून गुणपत्रिका घेऊन घरी जाण्यासाठी निघाल्या. तेव्हा डुबेरे येथून आटकवडेला कोंबड्या घेऊन जाणाऱ्या ॲपे रिक्षेत बसल्या. चालक समीर अहमद शेख याला आटकवडेला रिक्षा थांबवण्याचे लक्षात आलं नाही. अशात गायत्री आणि सायलीने आवाज देऊनही त्यास ऐकू गेले नाही. रिक्षा थांबत नसल्याने दोघींनी चालत्या रिक्षातून उडी घेतली. यात गायत्रीच्या डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

एक मुलगी गंभीर जखमी

सायलीच्या डोक्याला व हाताला मार लागल्याने ती जखमी झाली. रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी पुढे जाऊन रिक्षा चालकास थांबून घडलेला प्रकार सांगितला. स्थानिकांनी रुग्णवाहिका बोलून जखमी सायली हिला खाजगी रुग्णालयात दाखल केले. पोलीसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले, यावेळी रिक्षाचालक समीर शेख याला ताब्यात घेण्यात आलं. गायत्रीच्या वडिलांचे वर्षांपूर्वीच निधन झाले असल्याने ती मामाकडे आटकवडे डुबेरे येथे शिक्षणासाठी राहत होती,या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..
हेही वाचा -Two officers Arrested for Bribe : 50 लाखांची लाच स्वीकारताना चंद्रपुरातील दोन अधिकाऱ्यांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details