महाराष्ट्र

maharashtra

Wine Cell Grocery : वाईन विक्रीचा निर्णय निर्लज्जपणाचा कळस, भाजपा महिला आघाडीचा घणाघात

राज्यात वाईन विक्रीचा निर्णय घेण्यात ( Wine Cell Grocery ) आला. त्याविरुद्ध भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी निर्दशने केली आहे ( Bjp Woman Against Wine Cell Grocery ).

By

Published : Feb 14, 2022, 5:22 PM IST

Published : Feb 14, 2022, 5:22 PM IST

Wine Cell Grocery
Wine Cell Grocery

नाशिक -महाविकास आघाडी सरकारने किराणा दुकानात वाईन विक्री करण्याचा निर्णय ( Wine Cell Grocery ) घेतला आहे. त्याविरोधात नाशिक भाजपा महिला आघाडी आक्रमक झाली आहे. त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत वाईन ओतली. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली ( BJp Woman Against Wine Cell Grocery ) आहे.

राज्य सरकारने किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतल्याने भाजपाने या निर्णयाविरोधात राज्यात आंदोलन केली आहे. आज नाशिकच भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचा निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर वाईन ओतून राज्य सरकारविरोधात महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.

भाजपा महिला आघाडीची निदर्शने

वाईनचे सेवन शरीरास अपायकारक

ठाकरे सरकार अन्यायकारक असून, वाईन विक्रीचा निर्णय त्याचा कळस आहे. वाईनचे सेवन शरीरास अपायकारक आहे, असे बाटलीवर स्पष्ट नमूद असते. तरी देखील वाईन किराणा दुकानात विक्री हा निर्लज्जपणाचा कळस असल्याचा घणाघात करत भाजप महिलांनी रस्त्यावरच वाईन विकत जोरदार निषेध नोंदवला. दरम्यान, उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना या महिलांनी निवेदन दिले आहे

हेही वाचा -Devendra Fadnavis Criticized Congress : मोदींनी देशाची माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही - देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details