महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत कांद्याचे भाव घसरले; आता 'हा' भाव

पाकिस्तानचा कांदा बाजारात आल्याने भारतीय कांद्याची निर्यात जवळपास ५० टक्क्यांनी घटल्याने शेतकरी आणि निर्यातदार सगळेच चिंतेत सापडले आहेत.

Onion rate Lasalgaon
कांदा भाव बाजार समिती नाशिक

By

Published : Jul 18, 2021, 4:20 PM IST

नाशिक - शेतकऱ्यांच्या डोळ्यात नेहमीच वेगवेगळ्या कारणाने पाणी आणणारा कांदा यंदाही रडवतो की काय, अशी परिस्थिती दिसून येत आहे. कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पाकिस्तानचा कांदा बाजारात आल्याने भारतीय कांद्याची निर्यात जवळपास ५० टक्क्यांनी घटल्याने शेतकरी आणि निर्यातदार सगळेच चिंतेत सापडले आहेत.

माहिती देताना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे

हेही वाचा -बीड, नागपुरात काय चालू आधी ते बघावे, छगन भुजबळांचा चंद्रकांत पाटलांना टोला

सरासरी १ हजार ५०० रुपये इतकाच भाव

या सर्व गोष्टीचा विचार करता सरकारने काहीतरी पावले उचलणे गरजेचे आहे. लासलगाव बाजार समितीत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २ हजार २५० रुपये भाव मिळालेल्या कांद्याला आजमितीला मात्र सरासरी १ हजार ५०० रुपये इतकाच भाव मिळत आहे. तब्बल सातशे रुपयांनी कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी वर्गाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा स्वस्त दरात उपलब्ध

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा स्वस्त दरात उपलब्ध झाल्याने, तसेच देशांतर्गत उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान आदी राज्यांचा कांदा मोठ्या प्रमाणात निघत असल्याने राज्यातील कांद्याची मागणी घटली आहे. देशातील निर्यातीचे धोरण, तसेच कंटेनर वाहतुकीचे तिप्पट वाढलेले दर देखील कांदा दराच्या घसरणीत कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान पुढील काही दिवसांत कांद्याला पुन्हा तेजी मिळणार असून शेतकऱ्यांनी कांदा टप्प्या - टप्प्याने बाजारात विक्रीसाठी आणावा, असे आवाहन कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयदीप भदाणे यांनी केले.

वाहतुकीला एक टन मागे साधारण ४ हजार रुपये खर्च

गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने याचा सर्वच गोष्टींवर परिणाम बघायला मिळत आहे. शेतमालावरही याचा चांगलाच परिणाम बघायला मिळत आहे. त्यात ट्रान्सपोर्टचा खर्चही वाढत आहे. तीन महिन्यांपूर्वीची परिस्थिती जर बघितली, तर कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होता. नाशिकच्या लासलगाव कांदा मार्केटमधून फारसा काही कांदा निर्यात झाला नाही, मात्र आता दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या ठिकाणी कांदा निर्यात होत आहे. लासलगाव बाजार पेठेतून दिल्लीला कांदा वाहून नेण्यासाठी क्विंटलमागे ३५० ते ४०० रुपये खर्च येतो. म्हणजे एक टनमागे साधारण ४ हजार रुपये खर्च येतो. समजा ३० टन माल घेऊन जाणारा ट्रक असेल, तर साधारण १ लाख २० हजारच्या जवळपास खर्च येतो. त्यात आता डिझेलचे भावही वाढल्याने खर्च वाढत आहे.

हेही वाचा -नाशिककरांसाठी बॅड न्यूज; दर गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद

ABOUT THE AUTHOR

...view details