महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nashik Murder News : नाशकात दोन दिवसात चार हत्या; रस्त्याने कडेला पहाटे केली दगडाने ठेचून हत्या

Nashik Murder News : शुक्रवारी (आज) पहाटे चार वाजेच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळक्याने नाशिक रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पौर्णिमा बस स्टॉप समोरच हरीश भास्कर पाटील (४४,रा. फ्लॅट नंबर 10, सुयश सहकारी संस्था, पश्चिमरंग सोसायटी जवळ,जकात नाका पुणे) यांचा मृतदेह आढळून ( passerby was stoned to death in nashik ) आला.

passerby was stoned to death in nashik
नाशकात दोन दिवसात चार हत्या

By

Published : May 20, 2022, 4:28 PM IST

नाशिक - नाशिकच्या म्हसरूळच्या खुनाची घटना ताजी आहे. त्याच आता बस स्टॉप परिसरात रस्त्याने जाणाऱ्या पुण्याच्या एका व्यक्तीचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला ( passerby was stoned to death in nashik ) आहे. यामुळे नाशकात खळबळ उडाली आहे.

पुण्याला जाणाऱ्या वाटसरुची हत्या - मिळालेली माहिती नुसार, शुक्रवारी (आज) पहाटे चार वाजेच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळक्याने नाशिक रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पौर्णिमा बस स्टॉप समोरच हरीश भास्कर पाटील (४४,रा. फ्लॅट नंबर 10, सुयश सहकारी संस्था, पश्चिमरंग सोसायटी जवळ,जकात नाका पुणे) यांचा मृतदेह आढळून आला. याघटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वपोनी साजन सोनवणे, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मयत पाटील यांना दगडाच्या साह्याने मारले असल्याचे प्रथम दर्शनी लक्षात आले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रस्त्याने कडेला पहाटे केली दगडाने ठेचून हत्या

खुनाच्या घटनेने नाशिक हादरले -नाशिक शहरात दोन दिवसात चार खुनाच्या घटना घडल्याने भीतीचे वातावरण पसरले. 18 तारखेला दिंडोरी रोड वरील सावरकर गार्डन परिसरात रात्री 11 वाजता यश गांगुर्डे (वय 24 ) यांचा चार ते पाच संशयितांनी किरकोळ वादातून खून केला. याप्रकरणात सराईत गुन्हेगाराचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून याबाबत म्हसरुळ पोलीस तपास करत आहेत। तर दुसरीकडे अभोणा येथे डी फार्मसी शिक्षण घेत असलेल्या विपुल खैरे (वय 25) या तरुणाचा मृतदेह आनंदवाडी शिवारातील बेंडकुळे नगर येथे संशयास्पद अवस्थेत आढळला आहे. तो या परिसरात कसा आला याबाबत गूढ वाढले आहे. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त ॲक्शन मोडवर कधी येणार? -शहरातील गुन्हेगारी बघता पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांचा वचक आहे की नाही असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. पदभार घेतल्यावर गुन्हेगारीचा आढावा घेऊन दिशा ठरवण्याचे सांगितले होते. मात्र अजूनही ते ॲक्शन मोडवर न आल्याचे चित्र बघायला मिळते. वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिककर भयभीत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा -Ketki Chitale Police Custody : केतकीला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी; रबाळे पोलीस करणार चौकशी

ABOUT THE AUTHOR

...view details