नाशिक - माजी पोलीस आयुक्त दीपक पांडये यांचा भोंग्याबाबतचा मनाई आदेश नवे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे ( Nashik CP Jayant Naiknavre ) यांनी रद्द ( Nashik CP revoked order regarding loudspeaker issue ) केला आहे. भोंग्याबाबतची शहरातील सर्व परिस्थिती विचारात घेता स्वतंत्र आदेशाची गरज नसल्याचे नव्या पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.
3 तारखे पर्यंत भोंग्याचे परवानगी घेण्याचे दिले होते आदेश -17 एप्रिलला दीपक पांडये यांनी भोंग्याबाबत मनाई आदेश जारी केला होता.या आदेशानुसार 3 मेपर्यंत भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागणार होते. मात्र नवनियुक्त पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी नवीन आदेश काढून 17 एप्रिलचे आदेश रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. 17 एप्रिल रोजी तत्कालीन पोलिस आयुक्त दीपक पांडये यांनी सर्व धर्मियांना भोंगे आणि इतर साउंड सिस्टीम वाजवण्यासाठी पूर्व परवानगीचा आदेश दिला होता. नवे आयुक्त नाईकनवरे यांनी पदभार स्वीकारल्यावर अवघ्या पाच दिवसांनी पांडये यांचा आदेश रद्द केला आहे. नाशिक शहरात स्वतंत्र आदेशाची गरज दिसत नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल असे त्यांनी आदेशात म्हटले आहे.