पुणे -मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि सनातन संस्थेचे सदस्य असणाऱ्या समीर कुलकर्णी यांना आजपासून सशस्त्र पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना हे संरक्षण पुरवले आहे.
उत्तर प्रदेशमधील तिवारी हत्याकांडानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले असून, कुलकर्णी यांना निःशुल्क पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत कारागृहात असणारे कुलकर्णी हे सध्या जामिनावर बाहेर आहेत.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, शंकराचार्य आणि लेफ्टनंट कर्नल पुरोहित हेदेखील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी आहेत. यामधील प्रज्ञा ठाकूर यांना मध्यप्रदेश पोलीस, कर्नल पुरोहित यांना मिलिटरी पोलीस आणि शंकराचार्य यांना उत्तर प्रदेश पोलिसांचे संरक्षण मिळाले होते. तसेच सरकारी वकिलांनाही याआधी संरक्षण मिळाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये तिवारी प्रकरण घडल्यानंतर, केंद्र सरकारने मलाही संरक्षण दिले आहे, अशी माहिती समीर कुलकर्णी यांनी दिली.
हेही वाचा : केवळ अर्ध्या चपातीसाठी मुलीने घेतले पेटवून; बातमी पसरल्यानंतर प्रशासनाला जाग