नाशिक -नाशिक रोड परिसरातील रहिवासी भागात बिबट्या शिरला ( Leopard in Nashik ) आहे. जय भवानी रोड परिसरात आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. नाशिकरोड भागातील के जे मेहता शाळेजवळील पंचम सोसायटी माधव लॉन्स भागात भल्या पहाटे बिबट्यांने जणू मॉर्निंग वॉकच केला.
पंचम सोसायटी माधव लॉन्स भागात बिबट्या परिसरात बिबट्या वावरण्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद -
नाशिकरोड भागातील के जे मेहता शाळेजवळील पंचम सोसायटी माधव लॉन्स भागात भल्या पहाटे बिबट्या दिसून आल्याने नागरिकांमध्ये धावपळ निर्माण झाली होती,यानंतर स्थानिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्या बाबत माहिती कळवली, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आता या भागात पिंजरे लावण्याचं काम सुरू आहे. दरम्यान बिबट्याने एका जेष्ठ नागरिकावर हल्ला केला हल्ल्यात नागरिक जखमी झाला असून त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.परिसरात बिबट्या वावरण्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. वन विभागाकडून त्या भागात पिंजरे लावण्यात येत आहे मात्र तरीदेखील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा म्हणून या परिसरात वावरताना विशेष काळजीची घ्यावा, असे आवाहन वन विभागाकडुन करण्यात येत आहे.
हेही वाचा -Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील दोन दिवस थंडीची लाट कायम; 'या' जिल्ह्यात असेल जास्त थंडी