महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Hyenas Nashik : बिबट्या पाठोपाठ आता तरसाचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशकात बिबट्या पाठोपाठ आता तरसांचाही वावर पाहायला मिळतो आहे. शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास तरस हा वन्यप्राणी दिसल्याने खळबळ उडाली होती. या परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याचे स्थानिक नागरिकांनी वन विभागाला सांगितले, वन विभागाने शोध मोहीम घेतली असता रात्री उशिरा ते तरस असल्याचे निष्पन्न झाले. इंदिरानगर येथील रात्री दहा वाजेच्या सुमारास तरस हा वन्यप्राणी दिसल्याने खळबळ उडाली.

By

Published : Aug 7, 2022, 3:54 PM IST

Updated : Aug 7, 2022, 4:04 PM IST

तरस
तरस

नाशिक -माऊली लॉन्स परिसरात शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास तरस हा वन्यप्राणी दिसल्याने खळबळ उडाली होती. या परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याचे स्थानिक नागरिकांनी वन विभागाला सांगितले, वन विभागाने शोध मोहीम घेतली असता रात्री उशिरा ते तरस असल्याचे निष्पन्न झाले. इंदिरानगर येथील रात्री दहा वाजेच्या सुमारास तरस हा वन्यप्राणी दिसल्याने खळबळ उडाली. रहिवाशांच्या मदतीने वन कर्मचाऱ्यांनी तरसाला सुरक्षितरीत्या लष्कराच्या हद्दीतील जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले. इंदिरानगर परिसरात सुमारे तीन ते चार वेळेस बिबट्याने दर्शन दिले आहे. त्यापैकी तीन बिबट्यांना वनविभागाने पकडून जेरबंद केले होते.

नाशकात आढळलेला तरस

शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास योगेश मोरे हे त्यांच्या मोटारीने श्रद्धा विहार कॉलनीकडे जात होते. यावेळी कारसमोरून काही तरी वेगळा प्राणी धावल्याचे त्यांच्या लक्षात आले. खाली उतरून बघितले असता येथील एका उद्यानात तरस वन्यप्राणी संचार करत असल्याचे दिसले. दरम्यान, वनरक्षक शरद अस्वले, विशाल शेळके, विजय साळुंके आदी दाखल झाले. पहाटेपर्यंत वनकर्मचाऱ्यांनी गस्त करत तरसावर लक्ष ठेवून त्यास सुखरूपपणे लोकवस्तीतून लष्कराच्या हद्दीतील जंगलात पिटाळले. तत्पूर्वी चेतनानगरमधील रुपेश अहिवळे यांच्या सुयश बंगल्याच्या आवारात तरसाने फेरफटका मारला. त्यांचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल हाेत आहे. तर वन विभागाकडून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा -Guinness World Record : हेलिकॉप्टरला लटकून त्याने मारले 25 पुल अप्स; गिनीज बुकमध्ये विक्रमाची नोंद

Last Updated : Aug 7, 2022, 4:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details