महाराष्ट्र

maharashtra

Godavari River Flood नाशिकमध्ये पुन्हा गोदावरी नदीला पूर, अनेक मंदिरे पाण्याखाली

By

Published : Sep 16, 2022, 3:30 PM IST

Godavari River Flood जिल्हयासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणं ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून 7 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत केला जात असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे.

Godavari river flood
Godavari river flood

नाशिकजिल्हयासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे Nashik Rain गंगापूर धरणं ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून 7 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत केला जात असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. Maharashtra Heavy Rain यामुळे रामकुंड परिसरातील लहानमोठे मंदिर पाण्याखाली गेले आहे. तसेच दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले आहे. Maharashtra Rain Updates यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. Nashik Flood In Godavari River पावसाचा जोर जर कायम राहिला तर मोठ्या प्रमाणात गंगापूर धरणातून पाण्याच्या विसर्ग केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

गोदावरी नदीला पूर अनेक मंदिरे पाण्याखाली

विधी करायला अडचणी सध्या पितृपक्ष सुरू असून नाशिकच्या गोदावरी नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात भाविक श्राद्ध तसेच विविध धार्मिक विधी करत असतात. Nashik Flood In Godavari River मात्र गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे गोदाघाट परिसर हा पाण्याखाली गेला आहे. परिणामी धार्मिक विधी करण्यास भाविकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत.

जिल्ह्यातील या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूदारणा धरण- 10562 क्यूसेस, मुखणे धरण- 1089 क्यूसेस, कडवा धरण- 5001 क्यूसेस, वालदेवी धरण- 407 क्यूसेस, गंगापूर धरण- 4815 क्यूसेस, आळंदी धरण- 446 क्यूसेस, भोजपुर धरण- 990 क्यूसेस, होळकर पुला खालून- 7830 क्यूसेस, नादुर माध्यमेश्वर धरण- 36731 क्यूसेस, पालखेड- 5538 क्यूसेस

ABOUT THE AUTHOR

...view details