नाशिक- जिल्हा न्यायालयाच्या बेलिफ कार्यालयाला अचानक आग लागल्यामुळे न्यायालयात एकच खळबळ उडाली. अग्नीशामक दलाच्या जवानांनी शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली आहे.
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातील बेलिफ कार्यालयाला आग..!
ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नसले तरी मात्र या आगीमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
नाशिकच्या सीबीएस परिसरात असलेल्या नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. पुणे, नाशिक जिल्हा न्यायालयातील बेलिफ कार्यालयाच्या जुन्या इमारतीला दुपारी अचानकपणे ही आग लागली असून आग लागली असून आग लागल्याचे समजताच नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब या ठिकाणी पाचारण करण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या काही तासांपासून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत असून सध्या आटोक्यात आली आहे.
आगीत अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळाल्याची प्राथमिक माहिती..
दरम्यान, ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नसले तरी मात्र या आगीमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र अनेक कागदपत्रे जळून नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे. तर न्यायालयाच्या आवारात आपल्या दैनंदिन कामासाठी गेलेले वकील तसेच वेगवेगळ्या कामासाठी गेलेल्या नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले असून न्यायालयाच्या आवारात देखील चांगलीच खळबळ उडाली. शिंगाडा तलाव येथील अग्निशमन केंद्रातून दोन बंब तातडीने जिल्हा न्यायालयात दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. न्यायालयाच्या आवारात अचानकपणे लागलेल्या आगीने खळबळ उडाली असून याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.