नाशिक - इगतपुरी शहर हद्दीतील तळेगाव शिवारात ( Plastic Toy Company Fire ) असलेल्या एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली आहे.
कोणतीही जीवितहानी नाही -
इगतपुरी शहर हद्दीतील तळेगाव शिवारातील गोयंका प्लास्टिक कारखान्याला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली होती. या कंपनीत प्लास्टिकचे पुतळे तयार करण्यात येत होते. गेल्या काही दिवसांपासून कंपनी बंद होती. या आगीत प्लास्टिकच्या पुतळ्यासहित बरेचसे सामान भस्मसात झाले, तर झाडेही मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली आहेत. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. तसेच आगीत किती रुपयाचे नुकसान झाले, याचाही आकडा अद्याप उपलब्ध झालेला नाही. आग विझविण्यासाठी इगतपुरी नगरपरिषदेचे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाच्या वाहनांकडून शर्थीचे करण्यात आले, चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली आहे.
हेही वाचा -छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची कधीच भेट झाली नाही; श्रीपाल सबनीस यांनी सांगितला इतिहास