नाशिक - नाशिक हे सायकल कॅपिटल शहर म्हणून ओळखू लागले आहे. दिवसेंदिवस सायकलिस्टची संख्या वाढत आहे. शहरात ठिकठिकाणी सायकल ट्रक होणं गरजेचं असून, स्मार्ट सिटी अंतर्गत तयार होणारे दोन सायकल ट्रक लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नाशिक सायकलिस्ट असोसिएशनने केली आहे.
हेही वाचा -शरद पवार गॉडफादर, सरकारवर कंट्रोल तरी आरक्षण का नाही? - चंद्रकांत पाटील
आध्यत्मिक, धार्मिक, कुंभनगरी, वाईन कॅपिटल सिटी अशी जागतिक ओळख असलेलं नाशिक शहर आता सायकल कॅपिटल सिटी म्हणून ओळखू लागले आहे. नाशिकमध्ये दिवसेंदिवस सायकलिस्टची संख्या वाढत असून, अनेक जण आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणासाठी सायकलिंगकडे वळू लागले आहेत. नाशिकच्या सायकलपटूंनी अल्पावधीतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाशिकचे नाव पोहचवले आहे. नाशिकमध्ये सायकल ही एक चळवळ झाली असून, पर्यावरण संरक्षणासाठी सायकल चळवळीला अधिक वाव देण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत दोन सायकल ट्रक तयार करण्यात येत आहेत. या सायकल ट्रकचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी नाशिक सायकल असोसिएशनने केली आहे.