महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महापालिकेचा नागरिकांना अल्टीमेटम; काझी गढीवरील धोकादायक घरे खाली करा, अन्यथा . . .

काझीगढी येथील घरे तात्काळ रिकामी करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून रहिवाशांना करण्यात आले आहे. महापालिकेने नागरिकांच्या निवाऱ्याची तात्पुरती व्यवस्था महापालिकेच्या शाळांमध्ये केली आहे.

काझी गढीवरील घरे

By

Published : Jul 6, 2019, 6:16 PM IST

नाशिक- जुन्या नाशिकमधील धोकादायक झालेल्या काझीगढी येथील घरे तात्काळ रिकामी करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून रहिवाशांना करण्यात आले आहे. महापालिकेने नागरिकांच्या निवाऱ्याची तात्पुरती व्यवस्था महापालिकेच्या शाळांमध्ये केली आहे. मात्र, तिथे जाण्यास रहिवाशांनी नकार दिला. त्यामुळे पोलीस बळाचा वापर करून घरे खाली केली जातील, असा अल्टीमेटम महापालिकेने रहिवाशांना दिला आहे.

माहिती देताना नागरिक


जुन्या शहरातील धोकादायक काझी गढीचा काही भाग कोसळला आहे. येथील रहिवाशांच्या भवितव्याबद्दल चिंता निर्माण झाली आहे. या ठिकाणी दीडशेहून अधिक कुटुंबे राहतात. त्यातील 75 कुटुंब धोकादायक ठिकाणी आहेत. त्यांनी स्थलांतर करण्यासाठी महापालिकेने त्यांना नोटीस बजावल्या आहेत. परंतु कोणीही जागा सोडून जायला तयार नाही. अखेर पोलीस बाळावर रहिवाशांना घराबाहेर काढण्याचा इशारा महापालिकेला द्यावा लागला. मात्र मुदत उलटूनही प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही. तथापी पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. नागरिक जागा सोडण्यास नकार देत असले, तरी काझी गढीचा भाग आहे. त्यामुळे गढी ढासळत आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details