महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिक लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांना 1 लाख 20 हजारांची लाच घेताना अटक

दोन सेना अधिकाऱ्यांनी ठेकेदाराची बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात लाच मागितली होती. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयला) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Bribery Department Action Nashik) मुंबई कार्यालयातील वरिष्ठ निरीक्षक रणजीत कुमार पांडे यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई (CBI Trap) केली. (corrupt army officer arrest)

CBI arrested Corrupt Army Officers
CBI arrested Corrupt Army Officers

By

Published : Oct 14, 2022, 6:42 PM IST

नाशिक : येथील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या मिलिटरी इंजीनियरिंग सेवेतील सहाय्यक गॅरीसन अभियंता संशयित मेजर हिमांशू मिश्रा आणि कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडीले या दोघा अधिकाऱ्यांना एक लाख वीस हजारांची लाच येताना सीबीआयच्या पथकाने अटक ( CBI Arrest Army Officer Taking Bribe) केली. ठेकेदाराची बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात त्यांनी लाच मागितली होती. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयला) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Bribery Department Action Nashik) मुंबई कार्यालयातील वरिष्ठ निरीक्षक रणजीत कुमार पांडे यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई (CBI Trap) केली. (corrupt army officer arrest)

कारवाईने लष्कराच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ -मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा बांधकाम व्यवसाय असून त्याने नाशिकरोड येथील गांधीनगर परिसरातील सैन्य दलाच्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये विविध कामांचे कंत्राट घेतले होते,मुदतीत काम पूर्ण करूनच त्याचे सुमारे 50 लाखांचे बिल मंजूरी साठी सादर केले होते; मात्र बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात संशयित मिश्रा आणि वाडिले यांनी ठेकेदाराकडे 1 लाख 50 हजारांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने थेट सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार मिश्रा व वाडिले यांना त्यांच्याच आवारात लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांना अटक करून मुंबईमध्ये निल्याचं सूत्रानी सांगितले. या कारवाईने लष्कराच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details