नाशिक - भाजप नगरसेविका तसेच महिला बालविकास समितीच्या सभापती सरोज आहिरे यांनी पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. तसेच राष्ट्रवादीकडून त्यांना देवळाली मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचा फटका बसला आहे. सरोज आहिरे यांनी गुरूवारी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर अहिरे यांना पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादीकडून देवळाली मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी देखील देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपला या मतदारसंघात आता बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे.