नाशिक - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी औपचारिक चर्चा करताना मोठे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. रात्रीतून कोणालाही अटक होऊ शकते, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, यावर त्यांनी आता सारवासारव करत, ज्या नेत्यांच्या चौकशी सुरू आहेत त्यांच्या पैकी कोणालाही अटक होऊ शकते, असे म्हटले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचा रोख नेमका कुणाकडे याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.
प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही वाचा -इम्रान खान वर विश्वास ठेऊ नये- संजय राऊत
- चंद्रकांत पाटील नाशिक दौऱ्यावर -
चंद्रकांत पाटील दोन दिवसांच्या नाशिक दौर्यावर आहेत. नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता असून, पक्षांतर्गत फोफावलेली गटबाजी, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी ते आज नाशिकमध्ये पक्ष पदाधिकारी, नगरसेवक यांच्याशी चर्चा करणार आहेत. आज दिवसभर त्यांच्या उपस्थितीत विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
- आधी चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य -
नाशिक येथील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, आपण पत्रकार परिषदेत सविस्तर बोलू, असे सांगत राज्यात मोठया घडामोडी घडत आहेत. काय माहिती रात्रीतून कुणाला अटक झाली तर तुम्हाला माझी प्रतिक्रिया घ्यावी लागेल, असे वक्तव्य त्यांनी अनौपचारिक गप्पा मारताना केले होते..दरम्यान, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मनीलाँड्रींग प्रकरणी कारवाई सुरू आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी जमीन घोटाळा, तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर मनीलाँड्रींग प्रकरणी कारवाई सुरू आहे.
अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी लावा म्हणून कोणीतरी कोर्टात गेले आहे. अजून नितीन राऊत यांच्याबद्दल कोणीतरी कोर्टात गेले आहे. त्याबद्दल कोर्टाने फटकारले आहे. चौकशी करा, राठोड यांच्याबाबत कोर्टाने क्लीन चिट दिली असताना कोर्टाने एक मॅटर पेंडीग आहे, अशी मोठी रांग आहे, ज्याच्यावर टांगती तलवार आहे. त्यामुळे मी नेमकं कोणाचे नाव घेऊन बोललो नाही, मी फक्त म्हटले होते की, इतक्या लोकांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे कोणालाही अटक होऊ शकते.
हेही वाचा -PowerGame? : शरद पवारांनी दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट, तासभर खलबतं; तर्क-वितर्कांना उधाण