नागपूर -भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नागपूरमध्ये आपण शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे. तसेच आपण पक्ष सोडणार, या निव्वळ अफवा असून तसा कोणताही विचार नसल्याचेही खडसे यांनी सांगितले आहे.
एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया... हेही वाचा... नागपूर महापौरांच्या गाडीवर गोळीबार, जोशी थोडक्यात बचावले
आपल्या वैयक्तीक कामांसाठी आपण नागपूरला आलो आहोत. याचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये. कुठल्याही प्रकारे पक्ष बदलण्याचा विचार नाही. तसेच पक्ष बदलण्याचा विषय नसल्याने त्याबाबत वरिष्ठांसोबतही चर्चा केली नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार आहोत. मात्र ही भेट वैयक्तीक स्वरूपाची असणार आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... हिवाळी अधिवेशन : नागपूरच्या माणसाने नागपुरातील जनतेशी बेईमानी केली, वडेट्टीवारांचा फडणवीसांना टोला