महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

VK Singh On Congress : विरोधक सरकारला बदनाम करण्यासाठी दंगली घडवते; 'अग्निपथ'वरून व्ही. के. सिंग यांचा काँग्रेसवर आरोप

अग्निपथ योजनेला ( Agnipath Scheme ) देशभरात विरोध होत आहे. विरोधकांना एकच काम आहे, सरकारची कितीही चांगली योजना असली तरी त्याला रोखण्याचे काम ते करत आहेत. सरकारला बदनाम करून दंगे घडविण्याचे काम देशात विरोधक, काँग्रेस करत असल्याचाही गंभीर आरोप लष्कराचे माजी जनरल व्ही. के. सिंग ( VK Singh ) यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केला आहे. ते नागपुरात रस्ते अपघात रोखण्यासाठी काम करणाऱ्या जन आक्रोश संघटनेच्या ( Mass Outrage Organization ) कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.

Vk Singh
Vk Singh

By

Published : Jun 19, 2022, 8:54 PM IST

नागपूर - अग्निपथ योजनेला ( Agnipath Scheme ) देशभरात विरोध होत आहे. विरोधकांना एकच काम आहे, सरकारची कितीही चांगली योजना असली तरी त्याला रोखण्याचे काम ते करत आहेत. सरकारला बदनाम करून दंगे घडविण्याचे काम देशात विरोधक, काँग्रेस करत असल्याचाही गंभीर आरोप लष्कराचे माजी जनरल व्ही. के. सिंग ( VK Singh ) यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केला आहे. ते नागपुरात रस्ते अपघात रोखण्यासाठी काम करणाऱ्या जन आक्रोश संघटनेच्या ( Mass Outrage Organization ) कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.

Vk Singh

कारगिल युद्धापासून अल्प कालावधीसाठी सैन्य भरती व्हावी अशा या योजनेवर चर्चा सुरू आहे. त्यावेळी जी कमिटी झाली तेव्हापासून त्यापासूनच यावर काम सुरू आहे. अल्प कालावधीसाठी सैनिक आले तर यापासून सेनेत फायद्याचे आहे. अनेक वर्षांपासून नागरिकांना लष्करी प्रशिक्षण मिळावे, अशी मागणी होत होती. ती मागणी या निमित्ताने पूर्ण होणार आहे.

चार वर्षे सैन्यात काम केलेल्या जवानाला मदतीची गरज नसते -सैन्यात काही लोक हे अल्प कालावधीसाठी आले तरी चार वर्षांनीं तर 75 टक्के लोकांसाठी इतर पर्याय खुले होणार आहेत. हरियाणा आणि केंद्र सरकारने त्यांना प्राधान्य देण्याचे म्हटले आहे. पण यात काही 25 टक्के लोकांमध्ये सेवेतील कर्तुत्व दिसून आले तर त्यांचा कार्यकाळ पुढे सैन्यात वाढवून देणार आहे. चार वर्षे त्याने सेनेत आपली सेवा दिली असली की त्याची मानसिकता बदललेली असते. त्यांना कोणाच्याच मदतीची गरज, नसते. तो सक्षम असतो, परिस्थितीला समोरा जाण्यासाठी मानसिकता तयार असते, असे मला वाटत असल्याचे माजी जनरल तथा केंद्रीय राज्यमंत्री वी के सिंग म्हणाले.

सेना हे देशसेवेचे व्रत आहे -सेना हे काही बेरोजगारी दूर करण्याचे साधन नाही, की दुकान नाही, की कोणती कंपनी नाही. यात लोक हे स्वेच्छेने, देशासाठी जीव पणाला लावून देण्याची शपथ घेऊन येतात. यात अनेकांना वाटते तेव्हा ते सोडूनही जातात. अनेकांनी पेंशन न घेताही नोकरी सोडून गेले आहेत, पण त्या लोकांनी काही ट्रेन जाळाली नाही की, आंदोलन केले नाही. सैन्याच्या सेवेला मला हा रोजगार हा शब्द का वापरला जात आहे हेच कळत नाही, असेही सिंग म्हणाले. युवकांना भरकटण्याचे काम काँग्रेस या माध्यमातून करत आहे. अत्यंत खालच्या दर्जाचे काम विपक्ष करत असल्याचीही टीका केली त्यांनी केली.

हेही वाचा -Uddhav Thackeray : 'हातामध्ये काम नसेल तर, नुसते राम राम करुन...'; 'अग्निपथ'वरुन उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details