महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 20, 2022, 3:51 PM IST

ETV Bharat / city

Vidarbha Separation भाजपने दगा केल्यामुळेच विदर्भ राज्याची निर्मिती होऊ शकली नाही- विजय जावंधिया

Vidarbha Separation विदर्भ वेगळा झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होऊ शकतं नाही, अशी भूमिका शेतकरी नेते आणि जेष्ठ विदर्भवादी नेते विजय जावंधिया यांनी मांडली आहे. ते आज राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत सहभागी होण्यासाठी आले असताना बोलत होते. विदर्भाच्या आंदोलनात आता मिशन ३० हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Vijay Jawandhia
Vijay Jawandhia

नागपूरविदर्भ वेगळा झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होऊ शकतं नाही, अशी भूमिका शेतकरी नेते आणि जेष्ठ विदर्भवादी नेते विजय जावंधिया ( Farmer leader and senior Vidarbha leader Vijay Javandhia ) यांनी मांडली आहे. ते आज राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत सहभागी होण्यासाठी आले असताना बोलत होते. विदर्भाच्या आंदोलनात आता मिशन ३० हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विदर्भाची मागणी इतर राज्यांच्या तुलनेत खूप जुनी होती. ( Vijay Jawandhia statement In Nagpur ) मात्र भारतीय जनता पक्षाने विदर्भासोबत दगा केल्यामुळेचं विदर्भ राज्याची निर्मिती होऊ शकली नाही, असा आरोप विजय जावंधिया यांनी केला आहे.

प्रशांत किशोर संवाद साधणार विदर्भ हे देशाचे तिसावे राज्य होणार का ? या प्रश्नाचे उत्तर गेल्या अनेक दशकांपासून शोधले जातं आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्याने या प्रश्नाचे उत्तर मिळू शकले नाही. मात्र, आता देशाच्या राजकारणातील एक यशस्वी रणनीतीकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोरचं या आंदोलनाशी जुळल्याने पुन्हा लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. प्रशांत किशोर यांच्या टीमने विदर्भ राज्यासाठी खास विवरचना आखायला देखील सुरुवात केली आहे. गेल्या काही आठवडे प्रशांत किशोर यांच्या टीमने विदर्भात ठिकठिकाणी जाऊन विदर्भाच्या मागासलेपणाचे तसेच विदर्भा संदर्भातले मुद्दे समजून घेत त्याचा अहवाल तयार केला आहे. या सर्व मुद्द्यांवर प्रशांत किशोर विदर्भवाद्यांसोबत संवाद साधणार आहेत. प्रशांत किशोर वेगळ्या विदर्भाच्या चळवळीसाठी काय योगदान देऊ शकतात, ते कोणती रणनीती समोर ठेवतात. हे जाणून घेण्यासाठी अनेक विदर्भवादी नेते आजच्या बैठकीत सहभागी झाले आहेत.

विदर्भ वेगळा झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होऊ शकतं नाही

पुणेपेक्षा नागपूरला पुढे न्या वेदांता समूहाचा फॉक्सकॉनचा सेमी कंडक्टर चीफ तयार करण्याचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे. या टिकेला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, की पुढील काही वर्षात महाराष्ट्र गुजरातच्या पुढे घेऊन जाणार, यावर बोलताना शेतकरी नेते विजय जावंधीया म्हणाले आहेत. गुजरातचं तर सोडाचं फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी आधी नागपूरला पुणे शहरापेक्षा पुढे घेऊन जावं असे त्यांनी यावेळी म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details