नागपूरराजकीय, सामाजिक असो किंवा विकासाचा मुद्दा त्यावर अगदी स्पष्टपणे आपले मत मांडणारे राजकीय पुढारी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. मात्र, हाच स्पष्टवक्तेपणा नितीन गडकरींना भोवला असल्याची चर्चा देशाच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली Nitin Gadkari exclusion from BJP top panels आहे. नितीन गडकरी यांना जनता पक्षाच्या संसदीय मंडळातून वगळण्यात आल्यानंतर राजकीय जाणकारांकडून याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. गडकरी यांच्या स्पष्टवक्तेपणामुळेच त्यांना संसदीय मंडळात Parliamentary Board स्थान देण्यात आले नसावे, अशी शक्यता वर्तवली जात RSS Role Behind Gadkari Exclusion From Top Panel आहे.
गडकरींना वगळण्यात संघाची संमतीनितीन गडकरी यांना भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळातून वगळण्याचा निर्णय अजूनही भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेला नाही. गडकरी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अतिशय जवळचे मानले जातं. असं असताना देखील केंद्रीय नेतृत्वाकडून गडकरी यांचे राजकीय खच्चीकरण सुरू असल्याची चर्चा नागपूरच्या वर्तुळात सुरू आहे. एवढ्या मोठ्या घडामोडी घडल्यानंतर देखील संघाने मध्यस्थी का केली नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संघ नेतृत्वाच्या संमतीनेच नितीन गडकरी यांना पक्षाच्या संसदीय मंडळातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता, अशी देखील चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.