नागपूर: पुढील दोन दिवस पुन्हा पाऊस येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे, त्यानुसार मंगळवारी पहाटे पासून विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणातील गारवा आणखीच वाढला आहे.
Weather update : नागपूरसह विदर्भात दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज
गेल्या चार दिवसांपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भात अवकाळी पाऊस (unseasonal rain) सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले पीक भुईसपाट झाले आहे. हवामान विभागाच्या (Meteorological Department) अंदाजानुसार पुढील दोन दिवस पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहे. काही भागात पावसाची रिपरिप तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे
अवकाळी पावसाचा अंदाज
पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचे बघायला मिळत आहे. या पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यात गहू, तूर, चना, कापूस सह फळ भाज्यांचा समावेश आहे. आज पहाटे पासूनच नागपूर सह वर्धा आणि इतर जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असल्याने वातावरणातील गारठा आणखी वाढण्याची शक्यता आहे