नागपूर आझादीच्या अमृतमहोत्सवी वर्षात Amritmahotsav of Azadi देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोदी भक्त तरुण तब्बल 2 हजार किलोमीटरची यात्रा करत दिल्लीच्या दिशेने निघाला आहे नरेंद्र मोदींच्या यांचा वाढदिवस साजरा करण्याचे फलक घेऊन शहरा शहरातून पायदळ वाट काढत नागपूरातून पुढच्या प्रवासात रवाना झाला आहे. 60 दिवस रोज पायदळ चालून तो 17 सप्टेंबरला दिल्लीला पोहचणार आहे. सर्जिकल स्ट्राईक, राम मंदिर, कलम 370 यासह अनके देशहिताच्या निर्णयाला भावून त्याने पायदळ यात्रा करण्याचा निर्णय घेतला. त्याच्याबद्दल जाणून घेऊ या खास रिपोर्ट मधून
मूळचा आंध्र प्रदेश राज्यातील कडप्पा जिल्ह्यातील बदवेलचा 32 वर्षीय हा पथीपती नरसिम्हां असे या तरुणांचे नाव आहे. अंगात सदरा आणि पांढरी धोती, गळ्यात भगवा दुपट्टा, खांद्यावर एक बॅग, हातात छत्री असा पेहराव पाहून तुम्हाला हा तरुण ग्रामीण भागातून आलेला वाटत असला तरी तो एमबीए केले आहे. सध्या तो हॉटेल व्यस्थापन व्यवसायात कार्यरत आहे. नौकरीवर असतांना दोन महिन्याची सुट्टी घेऊन 2 हजार किलोमीटरची पदयात्रा करण्याचा निश्चय केला. 17 जुलैला पदयात्रा सुरू केली आहे. यात 17 सप्टेंबरला दिल्लीत पोहोचण्याच मानस आहे. सध्या त्याने जवळपास 930 किलोमीटर अंतर पायदळ चालून तो नागपुरला पोहचला आहे.