नागपूर-शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धन्वंतरी नगरात राहणाऱ्या प्रकाश सेलोकर नामक व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्यामुळे प्रकाश आर्थिक विवंचनेत असताना त्याचा त्याच्या बायकोसोबत तीन दिवसांपूर्वी वाद झाला होता. यातून त्याने आज गळफास घेऊन आत्महत्या केली.
दुहेरी नैराश्यातून नागपुरात टेलरने केली आत्महत्या
नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीलीत धन्वंतरी नगरात राहणाऱ्या एका टेलर व्यावसायीकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांनी नैराश्य आल्याने आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.
दुहेरी नैराश्यातून नागपुरात टेलरने केली आत्महत्या
प्रकाश सेलोकर हे व्यवसायाने टेलरचे काम करायचे, काही महिन्यांपूर्वी त्यांनी एक मालवाहू ऑटोसुद्धा विकत घेतला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने आणि ऑटोचे हफ्ते रखडल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे होते. तीन दिवसांपूर्वी प्रकाश सेलोकर यांचा पत्नीसोबत वाद झाला होता. पत्नी बोलत नसल्याने त्यांना नैराश्य आले होते, त्यातूनच आज त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.