नागपूरफॉक्सकॉनची गुंतवणूक जरी आता गुजरातमध्ये गेली असली तरी वेदांता समूहाने त्यांची भुमिका स्पष्ट केली असून ते महाराष्ट्रात देखील गुंतवणूक करणार आहेत. तसेच, वेदांता - फॉक्सकॉनबद्दल (vedanta foxconn) विरोधकांचे आरोप अतिशय तर्कशुन्य असल्याचा (Opponents allegations on vedanta foxconn) आरोप राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी केला आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नॅनोचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. तो गुजरातमध्ये गेला. तेव्हा आम्ही राजकारण केलं नाही. शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्याच्या औद्योगिक विकासासाठी धोरणं (Policies for Industrial Development) आखली जाणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
म्हणून शिवसेना सत्तेबाहेर जैतापूर आणि नाणार संदर्भात सेनेने आपली भूमिका बदलली. भुमिका बदलल्यानेचं त्यांना सत्तेवरुन दूर जावं लागलं. जनतेच्या मनात बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जे स्थान मिळवून दिलं होतं, त्याला आता धक्का बसला आहे. असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. नॅनो प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला तेव्हा आम्ही राजकारण केलं नाही. मागच्या सरकारच्या उदासीनतेमुळे राज्यातील अनेक प्रकल्प बाहेर गेले. तेव्हा आम्ही याचं राजकारण केलं नाही. गेले आठ महिने उद्योग महाराष्ट्रात लावण्याबाबत उद्योगपती चर्चा करत होते. तेव्हा वाटाघाटी होत होत्या. तेव्हा हे महाविकास आघाडी सरकार गंभीर नव्हते असा आरोप त्यांनी केला आहे.